तुम्हालाही कोरोनावरील लस घ्यायची आहे का? जाणून घ्या कसं करायचं लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोना महामारीमुळे लोकांचं आयुष्य जणू एकाच जागी थांबलं आहे. या महामारीवर लस केव्हा येणार? या एका गोष्टीकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. भारतातही तीन लसींवर काम सुरू आहे.

भारतात कोरोनावर लस बनवणाऱ्या तीनही कंपन्यांनी लसीच्या आपत्कालीन मंजुरीसाठी अर्ज केला आहे. यामुळे लवकरंच ही लस बाजारात उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र,  कोरोनावरील लस घेण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल, अशी माहिती समोर आली आहे.

लसीकरणासाठी एक विशेष अॅप विकसित केला गेला आहे. या अॅपमध्ये सर्व डेटा फीड केलेला असेल. तुम्हाला लस घेण्यासाठी या अॅपवर नोंदणी करावी लागेल. कोरोना लसीसाठी या अॅपवर जावून फोटो आयडी पुराव्यासह ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.

या अॅपमध्ये एक फॉर्म असेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं नाव, वय, वैद्यकीय माहिती अशा सर्व गोष्टी विचारल्या जातील. तसेच तुम्हाला या माहिती बरोबर एक फोटो देखील अपलोड करायचा आहे. हा फोटो लसीकरणाच्या वेळी पडताळणीसाठी वापरला जाऊ शकतो. अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन केल्यानंतरच तुम्हाला लस दिली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पुण्यातील सिरम इंस्टीट्युटने देखील आपल्या ‘कोव्हीशिल्ड’ लशीला आपत्कालीन मंजुरी मिळण्यासाठी ‘ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया’कडे अर्ज केला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत या लशीला मंजुरी मिळेल आणि पुढच्याच महिन्यात लशीकरण चालू होईल, अशी माहिती सिरम इंस्टीट्युटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे.

आम्हाला इमर्जन्सी लायसन्स चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल. मात्र, लशीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल. नियंत्रक यंत्रणेची परवानगी मिळाली तर भारताचा कोरोना लशीकरण कार्यक्रम जानेवारी 2021 मध्ये सुरू होऊ शकतो. असा विश्वास आम्हाला आहे, असं आदर पुनावाला यांनी म्हटलं आहे.

तसेच सुरुवातीला देशाच्या किमान 20 ते 30 टक्के लोकसंख्येला लस देण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियोजन करत आहे. तेवढा टप्पा पार पडल्यावर आपल्याला समाजात आत्मविश्वास दिसू लागेल, असंही आदर पुनावाला यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिताच भाजप नेत्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल!

अंकिता आणि सुशांतचा ब्रेकअप का झाला होता? अंकितानं केला मोठा खुलासा!

‘भाजपमधील 70 टक्के आमदार आमचेच, कोणाला परत घ्यायचं ते…’; छगन भुजबळांचं मोठ वक्तव्य!

शेतकरी आंदोलनावर कंगना पुन्हा बरळली! अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांवर गंभीर आरोप करत म्हणाली…

लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यांत बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करत नेहा म्हणाली…