कोरोना लस घ्यायला आलेल्या तरूणीला डॉक्टर म्हणाले ‘दफा हो जाओ’, पाहा व्हायरल व्हिडीओ

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. कोरोनाचा ही लाट आधिच्या लाटेपेक्षा खूप भयानक असल्याचं दिसून येतं आहे.

कोरोनाच्या या महाभयंकर विषाणूचा पराभव करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होतात त्यामुळे काहीजण लस घेत नाहीत. परंतू सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून लसीकरण न करून घेण्याचे आणखी एक नवीन कारण समोर आलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यासाठी आली असल्याचं दिसतं आहे. एक नर्स त्या तरूणीला लस देतं आहे. परंतू ती तरूणी नको, नको म्हणत आहे.

नर्स तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचही व्हिडीओमध्ये दिसतं आहे. ती तरूणी इंजेक्शन घेण्यास घाबरत असल्याची गोष्ट समोर आली आहे. त्या तरूणीबरोबर एक व्यक्ती आहे. तो तिला काही होणार असं सांगून समजवण्याचा प्रयत्न करत आहे.

नर्स वैतागून म्हणते की जर तुम्ही आम्हाला कॉपरेट केलं नाही, तर आम्ही कशी काय लस देणार. त्यानंतरही ती तरूणी ऐकायला तयार नसल्याचंच दिसतं आहे. परंतू अखेर त्या तरूणीला ती नर्स लस टोचते. त्यानंतर त्या तरूणीला म्हणते की ‘चल दफा हो जाऔ’ असं म्हणते.

हा व्हिडीओ ‘@logicalkpmurthy’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. शेअर करताना त्याने  ’18+Vaccination started. And look at our Bravehearts’ असं कॅप्शनही दिलं आहे.

तसेच हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्याचं हसू आवरत नाहीय. त्याचप्रमाणे या व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 1लाख 46 हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव झालं…

शेतातील नांगरणीवरून दोन भावांमध्ये वाद; कोरोनाबाधित रूग्णानं…

‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप, त्यामुळे…

पिसाळलेल्या हात्तीने गपचूप बसलेल्या म्हशीवर केला हल्ला…

समुद्रात शार्कची तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy