डॉक्टरचा ‘हा’ फोटो होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, कॅप्शन वाचून तुमचेही डोळे पान्हावतील

नवी दिल्ली | गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

सध्या करोनाची दुसरी लाट सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे. याच दरम्यान आरोग्य यंत्रनेवर खूप मोठा ताण आल्याचे दिसून येतं आहे. रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजन, बेडच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.

तसेच या सगळ्यात मागिल वर्षापासून डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णांची सेवा करत आहेत. या काळाच डॉक्टर हे आपल्या सर्वांसाठी एक देवासानचं आहे. सध्या उन्हाळा ऋतु सुरू आहे. वातावरणातील उष्णतेची प्रमाणा अधिकच वाढले आहे.

अशात रूग्णांची सेवा करताना कोरोना विषाणू पासून आपला बचाव करण्यासाठी डॉक्टरांना पूर्ण दिवसभर पीपीटी कीट घालून राहावं लागत. या कडाक्याच्या उन्हाळ्यात त्यांच्या अंगातून पाण्याच्या धारा वाहत असतील. अशातच याच संदर्भातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला हा फोटो एका डॉक्टरनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून पोस्ट केला आहे. यामध्ये दोन फोटो आहेत पहिल्या फोटोमध्ये डॉक्टरांनी पीपीटी किट घातलं आहे. तर दुसऱ्या फोटोकडे पाहून पीपीटी किट काढल्यानंतर डॉक्टरांची काय अवस्था होती हे कळतं आहे. दुसऱ्या फोटोमध्ये डॉक्टर संपूर्ण घामाने भिजलेले दिसतं आहे. त्यांचा शर्ट सगळा घामाने ओलाचिंब झाला आहे.

हा फोटोतील डॉक्टरांचं नाव सोहिल आहे. या फोटोखाली एक छानसं कॅप्शनही त्यांनी लिहिलं आहे. ते म्हणाले की, सगळे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने मी बोलतो आहे. आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर राहून प्रचंड काम करत आहोत. कधी पॉझिटिव्ह पेशंटपासून फूटभर अंतरावर, तर कधी गंभीर आजारी असलेल्या वृद्धांपासून इंचभर अंतरावर राहून. सर्वांनी लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन करतो. यातून सगळ्यातून बाहेर येण्याचा तोच एकच मार्ग आहे.

तसेच ‘देशाचा सेवक असल्याचा मला अभिमान वाटतो’ असंही त्यांनी असंही म्हटलं आहे. त्यांचं हे कॅप्शन वाचून अनेकांचे डोळे पान्हावले, तर अनेकांनी या डॉक्टरचं कौतुकही केलं आहे. हा फोटोवर अनेक कमेंटचा वर्षावही होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! बायकोचे दागिने विकून पठ्ठ्यानं रिक्षाला बनवलं…

कोरोना योद्धाला सलाम! कोरोनाने आई, वडिल, भावाचा मृत्यू तरीही…

चक्क लांडग्याने सिंहाची शेपटी खेचली अन्…, पाहा व्हिडीओ

IPL 2021: पंजाब किंग्सचा आरसीबीवर दणदणीत विजय

कौतुकास्पद! वाॅकरशिवाय चालताही न येणारा ‘हा’…