वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकट राहतेय? मग तुमच्या तेलकट त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्यावर जास्त दुष्परिणाम होताना दिसून येतात. उन्हाळ्याचा हंगाम येताच लोकांना बर्‍याच समस्याही येऊ लागतात. बदलत्या वातावरणामुळे अनेंकाची त्वचा तेलकट होते. त्वचेतील आद्रकतेचं प्रमाण कमी-जास्त होत असल्यामुळे आधिक काळजी घ्यावी लागते. घाम आणि त्वचेवरील अतिरिक्त तेलामुळे काही जणांना त्वचेच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या टाळण्यासाठी आपण काही सोप्या घरगुती टिप्स वापरु शकता.

1. तेलकट त्वचेमध्ये चेहऱ्यावर सतत तेल दिसतं. त्यामुळे निदान दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. पण त्वचा तेलकट आहे म्हणून अतिवापर करू नका. दोन वेळा चेहरा धुणं तुमच्यासाठी पुरेसं आहे. तसंच चेहरा धुताना सौम्य साबणाचा वापर करा हे लक्षात ठेवा.

2. आपली त्वचा नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी, स्कीन टोनरचा वापर करा. हे लक्षात ठेवा की कधीही अल्कोहोल बेस्ड टोनर वापरू नका. आपण त्यांचा वापर केल्यास आपली त्वचा कोरडे होईल. यामुळे आपल्या त्वचेवर खाज सुटणे आणि लाल पुरळ होण्याची शक्यता वाढेल.

3. उन्हाळ्यामध्ये शक्यतो मेकअप करणं टाळलं पाहिजे. तेलकट त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी नियमित चेहरा स्वच्छ करणे आणि त्वचेसाठी चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन निवडावे. मेडिकल सनस्क्रीन जास्त उपयुक्त असतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सनस्क्रीन भरपूर प्रमाणात लावावे. चेहरा, गळ्याचा भाग, हात आणि पायांवरही क्रीम लावणं आवश्यक आहे. दुसरे म्हणजे चेहरा धुताना, क्रीम किंवा फेस पॅक लावताना त्वचा रगडू नये. यामुळे चेहरा अधिक प्रमाणात तेलकट होण्याची शक्यता असते.

4. ओट्स हे तुमच्या चेहऱ्यावरील अधिक तेल शोषून घेतात. त्यामुळे ओट्सचा वापर तेलकट त्वचेसाठी करणं हे तुमच्यासाठी नक्कीच चांगला आहे. अर्धा कप ओट्स गरम पाण्यात भिजत घाला आणि त्यानंतर त्याची पेस्ट करा. त्यामध्ये एक चमचा मध घाला. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला साधारणतः तीन मिनिट्स लाऊन ठेवा. त्यानंतर तुम्ही गरम पाण्याने चेहरा धुवा.

5. तेलकट चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्यात तुमचा चेहरा तजेलदार होईल. मुलतानी मातीत पाणी टाकून चांगले मिश्रण करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. तुमचा चेहरा आधिक तचेलदार होईल. शिवाय त्वचेवरील तेलकटपणाही दूर झालेला असेल.

6. कोणत्याही मास्कमधील क्ले त्वचेच्या पोर्समधून सर्व घाण आणि अतिरिक्त तेल शोषण्यास मदत करते. हे मास्क आपल्या तेलकट त्वचेच्या अति-चमकण्याच्या समस्या देखील कमी करू शकतात.

7. उन्हाळ्यात त्वचा टॅन होते. उन्हाच्या गरम झळांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी कोरफडीचा गर, गुलाब पाणी, मुलतानी माती यांसारख्या घरगुती उपचारांची देखील मदत घ्यावी.

8. टॉमेटो या भाजीमध्ये तुम्हाला सॅलिसालिक अॅसिड सापडतं. त्यामुळे तुमच्या तेलकट त्वचेमधील तेल शोषून घेण्यासाठी याचा उपयोग होतो.

महत्वाच्या बातम्या –

मोठी बोतमी! पूजा चव्हाण प्रकरणात नवीन ट्वीस्ट, ‘या’ कारणाने वडिलांची पोलिस स्टेशनमध्ये धाव

‘सुशांत गेला यात माझी काय चूक आहे’; संतापलेल्या अंकिताचं ट्रोलर्सला सणसणीत उत्तर! पाहा व्हिडीओ

“भावा माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे माझ्या बापालाच जाऊन विचार”

अखेर पूजा चव्हाणचा पोस्टमॉ.र्टम रिपोर्ट आला समोर; मृ.त्युचं धक्कादायक कारण उघड!

‘आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण…’; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा