“मुख्यमंत्र्यांना बजेट कळतं का?, ते येड्या गबाळ्याचं काम नाही”

मुंबई | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी इंधन दरवाढीवरून राज्यांना सुनावलं. त्यावेळी महाराष्ट्राला देखील इंधन दरवाढ कमी करण्याचा सल्ला मोदींनी दिला आहे.

मोदींच्या या सल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधानांना प्रत्युत्तर दिलं आणि जीएसटीच्या वाट्याची रक्कमेचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर भाजप नेते भ़डकल्याचं दिसतंय.

देवेंद्र फडणवीस यांनी तीन ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतूक देखील केलं होतं. त्यानंतर आता भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचं बजेट 4,27,780 करोडचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 26,500 करोड जीएसटी परताव्यासाठी बोंबाबोंब करत आहेत. बजेटच्या तुलनेत जीएसटी रक्कम 6.19% इतकी होते, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

मग 94% उर्वरित बजेट मुख्यमंत्र्याला कळतो का?, असा सवाल यांनी त्यांनी उपस्थित केला आहे. बजेट म्हणजे काय एकदा मुख्यमंत्र्यानी सांगावं, अर्थकारण येड्या गबाळ्याचे काम नाही, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी देखील ट्विट करत मोदींची पाठराखण केल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता राज्यात नवा वाद निर्माण होणार की काय?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

वाद पाणी, जात अन् बाथरूमचा! मुंबई पोलिसांकडून राज्य सरकारला अहवाल सादर

 “माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो सगळ्यांना”; उदयनराजे कडाडले

 PM आणि CM यांच्यातील वाकयुद्धात फडणवीसांनी उडी; ट्विट करत म्हणाले…

सोमय्यांची जखम खरी की खोटी?, डाॅक्टरांचा अहवाल आला अन् स्पष्टच झालं…

 “…तर सोमय्यांची हत्याच झाली असती”; भाजप नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ