काही व्यायाम केल्यानेही वाढू शकतो हृदयविकाराचा धोका, वाचा सविस्तर

मुंबई | ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं काल म्हणजे गुरूवार 2 सप्टेंबर रोजी अकाली निधन झालं आहे. त्याच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे.

सिद्धार्थचा मृत्यू त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्यामुळे झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.सिद्धार्थ हा केवळ 40वर्षांचा होता.

तसेच आपल्याला माहित आहे की अभिनेत्री, अभिनेता आपल्या फिटनेसबाबत खूपच जागरूक असतात. त्यासाठी ते अनेक प्रकारचे व्यायाम, त्याचप्रमाणे खाण्या-पिण्याचे पथ्यही पाळत असतात. हे सगळ केवळ ते एका दिवसासाठी नाहीतर दररोज या सगळ्याचं पालन करत असतात.

आपल्याला हेही चांगलच माहित आहे की, आरोग्य चांगल ठेवायचं असेल तर आपल्याला दररोज कोणात्याही एका प्रकारचा व्यायाम करण आवश्यक आहे. जर आपण तो केला तर आपल शारिरीक तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहतं असं आपल्याला सांगितलं जातं.

सिद्धार्थ शुक्ला हा कोणत्याही मानसिक ताणतणावाखाली नव्हता. असं त्याच्या घरच्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याला कोणताही आजार नव्हता. तसेच तो नियमित व्यायाम, त्याच डाइट प्लॅन फॉलो करत असायचा. परंतू हे सगळं करत असुनही त्याला हृदय विकाराचा झटका आल्यामुळे सर्वांना अनेक प्रश्न पडले आहेत.

एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे की, काही व्यायम केल्यानं हृदयविकाराचा धोका वाढत आहे. विशिष्ट प्रकारचा व्यायाम करत असताना अनेक लोकांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

व्यायाम करण आरोग्यासाठी चांगलं असलं तरी, काही व्यायामाचे प्रकार हृदयविकाराचा धोका वाढवत असल्याचं एक अभ्यासातून पुढे आलं आहे.

अनेकांना आपल्या हृदयाचे स्नायू, त्या ठिकाणच्या रक्त वाहिन्या बळकट करण्यासाठी काही मिनिटं तीव्र स्वरूपाचा व्यायाम करायला सांगितला जातो. परंतू उच्च तिव्रतच्या व्यायामांमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असही एका अभ्यासादरम्यान पुढे आलं आहे.

त्यामुळे कोणताही व्यायाम करताना आपल्या क्षमतेपेक्षा जास्त करू नये. शारीरिक क्षमतेचा अंदाज घेऊन ते करावेत. तसेच व्यायाम करताना काही त्रास जाणवल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या-

‘बालिका वधू’ मालिकेतील ‘या’ तीन प्रमुख कलाकारांची प्राण ज्योत मावळल्यामुळे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला बसला मोठा धक्का!

जीवन खूप स्वस्त झालं आहे, असं म्हणत सिद्धार्थने मृत्यूच्या 6 दिवसांपूर्वी केलं होतं ‘हे’ उदात्त काम

सिद्धार्थच्या मृत्यूमागे आहे सुशांतच्या मृत्यूचं रहस्य?

सिद्धार्थची संपत्ती ऐकूण तुम्ही देखील थक्क व्हाल, वाचा सविस्तर

सिद्धार्थच्या मृत्यूचे दु:ख शहनाजला असहय्य, वडिलांनी दिली तिच्या प्रकृतीबद्दल माहिती