“मी मोदींबरोबर आहे, हे मी माझे नशीब समजतो”

टेक्सास |  भारत आणि अमेरिका एकमेकांचा सन्मान करतात. भारत देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य अतुलनीय आहे. मी मोदींबरोबर आहे, हे मी माझे नशीब समजतो, असे उद्गार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहे.

अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोदींसह डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचं तोंडभरुन कौतुक केलं. भारताचा खरा मित्र व्हाईट हाऊसमध्ये आहे, असं ते म्हणाले. तर ट्रम्प यांनी देखील मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.

भारतासाठी मोदींचे कार्य अतुलनीय आहे. भारताच्या जनतेने मोदींना बहुमत दिलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील देतो, असं ट्रम्प म्हणाले. 

भारतात पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत आहेत. त्यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात हजेरी लावल्याने मी अत्यंत आनंदी आहे. त्यांनी जर मला भारतात बोलावले तर मी आनंदाने जाईल, असंही ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात अनिवासी भारतीयांनी उपस्थिती लावली. मोदी आणि ट्रम्प यांचा मोठ्या प्रमाणात जयघोष करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-