डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरा मोठा झटका! पत्नी मेलानिया लवकरच घेणार घटस्फो.ट?

मुंबई | अमेरिकेच्या अध्यक्षीय पदावरून डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर बसण्याच्या महत्त्वकांक्षेवर पाणी फेरलं गेलं.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक संपल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत पराभव झाला असला तरी ट्रम्प हे मान्य करण्यास तयार नव्हते. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यातील नात्यात देखील आता फाटाफुट झाल्याच समजत आहे.

मेलानिया ट्रम्पने एका मीडिया अहवालात दावा केला आहे की, अध्यक्षीय निवडणुकीच्या पराभवानंतर आता त्या डोनाल्ड ट्रम्प यांना सोडतील. यामुळे लवकरच डोनाल्ड ट्रम्प यांना मेलानिया ट्रम्प घटस्फो.ट देतील, असं वृत्त समोर आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांच्यात 15 वर्षापूर्वी सुरु झालेलं नातं संपुष्टात आलं आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे. व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत आहेत.

मेलानिया ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये घटस्फो.टसंदर्भात सध्या चर्चा सुरु आहेत. यात मेलानियानं मुलगा बॅरेनचा ताबा आणि संपत्तीत अर्धा वाटा मागितला आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फो.ट होऊ शकतो. मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्पच्या लग्नाला स्टेफनी वोल्कॉफ यानं ट्रंजेक्शनल असं म्हटलंय. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय सहयोगी ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन यांनीही दोघांच्या नात्यात तडा गेल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, 1998 मध्ये मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रेमप्रकरण सुरु झालं होतं. त्यावेळी ट्रम्प यांचं वय 52 होतं तर मेलानिया याचं वय 28 होतं. त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये फॅशन वीक सुरु होता त्यानंतर टाइम्स स्क्वेअरच्या किटकॅट क्लबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.

या पार्टीमध्ये मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. 2004 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी 1.5 मिलिअन डॉलरची डायमंड रिंग मेलानियाला देत लग्नाची मागणी केली होती.

22 जानेवारी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. जवळपास 15 वर्ष हे दोघे विवाह बंधनात होते. मात्र, आता या दोघांचं वैवाहिक आयुष्य लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“पोलिसांनी आज सकाळी मला पुन्हा मारलं, माझा जीव धोक्यात आहे”

जो बायडन यांना शुभेच्छा देत रोहित पवारांचा भाजपवर जोरदार निशाणा!

कंगना पुन्हा बरळली! थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना गजनीची उपमा देत म्हणाली…

‘माझा नवरा बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींना…’; स्वतःच्या पतीविषयीच अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

रेखानं ‘या’ अभिनेत्यासोबत केलं होतं लग्न, मात्र अवघ्या काही दिवसांतच तुटलं नातं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!