मुंबई | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरचा आपला विश्वास व्यक्त केला आहे.
इम्रान खान आणि माझ्यात तालिबान, अफगानिस्तान, व्यापार अशा बऱ्याच मुद्दांवर चर्चा झाली. सध्या आम्ही पाकिस्तानसोबत व्यापार कमी करतो परंतू आता आम्हाला तो वाढवायचा आहे. ते खूप चांगल्या वस्तू बनवतात, आणि आम्ही देखील. त्यामुळे तो वाढवून दुप्पट, तिप्पट, चौपट करायचा आहे.
मला वाटतं सगळं ठीक व्हावं. प्रत्येकाशी चांगलं वागावं. भारत आणि पाकिस्तान हे दोन मोठे देश आहेत. त्यांनी सातत्याने लढणं ठीक दिसत नाही. दोघांनी एकत्र यावं हे दोन्ही देशांच्या हिताचं आहे, असंही ट्रम्प म्हणाले.
भारत-पाकिस्नानमधले संबंध चांगल रहावेत यासाठी दोन्ही देशांनी पुढाकार घेणं महत्वाचंं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत माझे चांगले संबंध आहेत. इम्रान खानही यांच्याशीही माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोेन्ही देश चर्चेसाठी तयार होतील. त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी मी तयार आहे, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.
दरम्यान, इम्रान खान यांच्यासोबत असणं हे मी माझं सौभाग्य आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“साताऱ्यात शरद पवारांना बिनविरोध करा अन् उदयनराजेंना राज्यसभेवर घ्या” – https://t.co/Zr6NISvDNR #विधानसभा2019
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 25, 2019
खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी मी सज्ज, मात्र डासांचा उच्छाद मला भोवला- सुप्रिया सुळे https://t.co/ncrmeCVIhH @supriya_sule @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 25, 2019
…म्हणून शरद पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजप प्रयत्न करतंय- धनंजय मुंडे https://t.co/PppBATNcpt @PawarSpeaks @dhananjay_munde @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 25, 2019