Top news आरोग्य कोरोना

चीनपासून वेगळं असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला इशारा

वॉशिंग्टन | चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली आणि तेथील एका अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला, असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच चीनने धमक्या दिल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संर्दभातली माहिती लपवून ठेवल्याचा धक्कादायक आरोप अमेरिकेने केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेला करण्यात येणारी मदतही रोखण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रोस अ‍ॅडॅनॉम यांना पत्र लिहून धोरणं सुधारण्याची विनंती केली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाबाबात वारंवार दुर्लक्ष करण्यात आलं असल्याचा आरोप देखील त्यांनी या पत्राद्वारे केला आहे.

येत्या 30 दिवसांत चीनपासून वेगळं असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला दिले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने हे सिद्ध न केल्यास जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणारा निधी कायमचा रोखण्यात येईल, असा इशारा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांनी पंतप्रधानांऐवजी एखादं पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहावं- देवेंद्र फडणवीस

-इतर राज्यांप्रमाणे शेतकरी, बारा बलुतेदारांना पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस

-…म्हणून हा परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो हातात घेऊन यूपीला रवाना झाला!

-मन मोठं असावं लागतं… भिकाऱ्याने 100 कुटुंबाला दिलं महिन्याभराचं राशन आणि 3 हजार मास्क

-“राहुल गांधींनी मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्याने निर्मलाताईंना दुख: झालं हे अक्रितच”