मुंबई | जमावबंदी आदेश लागू असला, तरी रक्तदान सुरुच राहणं आवश्यक आहे. राज्यात 10 ते 15 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गर्दी टाळून, अंतर राखून रक्तदान करा, अशी कळकळीची विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केली.
आपल्याला पूर्वीसारखे मोठे कॅम्प घेता येणार नाहीत. पण रक्तदान सुरु ठेवा. जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ‘सामाजिक अंतर’ राखून रक्तदान करावं, अशी विनंती टोपेंनी केली आहे.
रक्तदान करताना कोणताही संसर्ग होणार नाही, याची फक्त काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत रक्त देऊ नये, असा कुठलाही नियम नाही. आम्ही याबाबत संपूर्ण अधिकृत माहिती घेतली असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज 89 रुग्ण आहेत, त्यापैकी 1 पुण्याचा आणि 1 मुंबईचा आयसीयूमध्ये आहे अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची सद्यास्थिती #CoronaVirusUpdates#MeechMazaRakshak#मीचमाझारक्षक#मैंहीमेरारक्षक pic.twitter.com/AlQyTsRVI3
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 23, 2020
महत्वाच्या बातम्या –
-“आई दवाखान्यात असताना महाराष्ट्राचा लढवय्या लेक कोरोनाच्या विरोधात लढत आहे”
-कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये मदतीसाठी सरसावले ‘हे’ उद्योगपती
-वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी जिओचा खास प्लॅन लाँच; मिळणार तब्बल 102 जीबी डेटा
-“चीनने आपल्या कोरोना व्हायरससंबंधी लवकर माहिती द्यायला हवी होती”