पुणे : मुंबईच्या डोंगरी भागातील केसरबाई ही इमारत खेकड्यांनी पाडली असं सरकारने जाहीर करुन टाकावं, असा खोचक टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. ते पिंपरीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
तिवरे धरण खेकड्यांनी पोखरलं म्हणून फुटलं असा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. त्याचाच संदर्भ देत अजित पवारांनी मुंबईतील डोंगरी दुर्घटनेवरुन सरकारला धारेवर धरलं आहे.
खेकड्यांचा जीव केवढा, धरण केवढं…किती खोट बोलावं. आता केसरबाई ही इमारतही खेकड्यांनीच पाडली की काय? असा प्रश्न पडत आहे, असं ते म्हणाले.
केसरबाई ही 100 वर्षे जुनी इमारत कोसळून 10 ते 15 कुटुंबातील 13 जणांचा मृत्यू झाला. इमारत मोडकळीला आली होती. डोंगरी भागात अशा सारख्या इमारती कोसळून अनेकांचे जीव जात आहेत.
केसरबाई इमारतीची डागडूजी करण्याचे काम विकासकाकडे दिले होते. ते काम का पूर्ण करण्यात आलं नाही? असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात आला.
दरम्यान, इमारत खेकड्यांनी पाडली असं सांगून टाका, असं म्हणत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-