दिवाळीत फटाके फोडू नका; ‘या’ कारणामुळं तज्ज्ञांनी दिला सर्वात मोठा इशारा

नवी दिल्ली | भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचा आणि मोठा मानला जाणारा दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. प्रकाश आणि आनंदाचा मानला जाणारा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी सणानिम्मित घरी वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवले जातात. तसेच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण फटाके वाजवण्याचा आनंद घेतात.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाकाळातील प्रत्येक सण अनेक निर्बंधांसहित आपण साजरा केला आहे.  इतर सणांबरोबरच दिवाळीचाही आनंद आपल्याला फारसा लुटता येणार नाही. अशातच आता कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील तज्ञांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

या दिवाळीत सामजिक अंतरांचं पालन करून सण साजरे करण्याचं आवाहन तर सरकारकडून करण्यात आलंच आहे. मात्र, त्याबरोबरच इतरही काही सूचना तज्ञांनी दिल्या आहेत. तज्ञांनी या दिवाळीत फटाक्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.

यंदाच्या दिवाळीत फटाके फोडू नका, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. आपण या दिवाळीत जर फटाके फोडले तर त्याचा धूर मोठ्या प्रमाणात वातावरणात मिसळला जाईल. हा धूर वातावरणात मिसळल्यानंतर कोरोना रुग्णांवर विशेषतः जेष्ठ रुग्णांवर याचा गंभीर परिणाम होईल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

फटाके फोडल्यानंतर त्याचे एरोसेल नावाचे छोटे छोटे कण हवेत मिसळले जातात. एरोसेलच्या या कणांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आणखीनच वाढत जातो. यामुळे दिवाळीच्या काळात कोरोना खूप वेगानं पसरू शकतो, असं तज्ञांनी म्हटलं आहे.

फटाके वाजवल्यानं मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. तरीही आपण हौस म्हणून खूप मोठ्या प्रमाणात फटाके फोडत असतो.

मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे. कारण या फटाक्यांमुळे कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांचे किंवा कोरोनाच्या अॅक्टीव्ह पेशंट्सचे प्रसंगी जीव धोक्यात येवू शकतात.

दरम्यान, कोरोनाकाळातील अनेक सांस्कृतिक सणांच्या वेळी राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. दिवाळी सणाच्या निम्मिताने राज्य सरकार कोणत्या गाईडलाईन्स जाहीर करतंय का?, हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सोनं खरेदी करणार असाल तर थोडं थांबा; मोदी सरकार आणतंय ‘ही’ मोठी योजना!

भाजपच्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं काँग्रेसच्या पंजाला मतदान करण्याचं आवाहन!

फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला ठाकरे सरकारनं दाखवली केराची टोपली!

सुशांत प्रकरणी चालू झालेल्या ‘त्या’ वादावर अखेर सलमानने मौन सोडलं; शाहरुखचं नाव घेत म्हणाला…

‘या’ बड्या अभिनेत्रीच्या पाठीमागे लागलंय भूत! अभिनेत्रीने स्वतः दिली माहिती