Top news विदेश

‘KISS करू नका आणि जोडप्यांनी सोबत झोपू सुद्धा नका’; लाॅकडाऊन लागताच अजब आदेश निघाले

बिजींग | चीन पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. चीनच्या शांघाय शहरात कोरोनाने कहर केला आहे. वेगाने पसरणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडक लॉकडाऊन लागू केले आहेत.

शांघायमधील सुमारे 26 मिलीयन लोक सध्या घरातच कैद आहेत. प्रशासनाकडून विचित्र कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. सोशल मीडियावर हा प्रोटोकाॅलचा आदेश व्हायरल देखील होतोय.

शांघाय हे चीनमधील सध्याच्या कोरोना उद्रेकाचे हॉटस्पॉट आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन संसर्गाच्या संख्येत घट झाली असली तरी, इतर देशांच्या तुलनेत ती अजूनही जास्तच आहे.

काही लोक कोरोना लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या घोषणांशी संबंधित मजेदार व्हिडिओ शेअर करत आहेत.

आज रात्रीपासून जोडप्यांनी वेगळे झोपावे आणि किस घेऊ नये, असं या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे. आपल्या आत्म्याच्या स्वातंत्र्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवा. खिडकी उघडू नका आणि गाणं म्हणत रहा, असा संदेश व्हिडीओमधून देण्यात आलाय.

दरम्यान, कोरोना रूग्णसंख्या जास्त असलेल्या भागात एक ड्रोन उडताना दिसत आहे. त्याद्वारे या घोषणा देण्यात येत असल्याचा हा व्हिडीओ आहे. कोरोनामुळे घरातच अडकलेल्या लोकांनी हा मजेशीर व्हिडीओ व्हायरल केला आहे.

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या –

Gold Silver Rate: सोनं-चांदी पुन्हा महागलं; जाणून घ्या आजचे ताजे दर

“गजा मारणेचंही स्वागत झालं होतं, मग तो काही आदर्श पुरूष आहे का?”

“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??, कारवाई झाली की बोंबलायचं अन्…”

ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…

नितेश राणेंच्या अडचणी वाढणार?; पोलिसांनी मोठं पाऊल उचललं