‘नेत्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का?’ केदार शिंदेंचा संतप्त सवाल

मुंबई| देशात कोरोनाने रौद्र रुप धारण केले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा चांगलाच तडाखा महाराष्ट्रासहीत सर्वच राज्यांना बसला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय.

ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कठीण परिस्थितीत प्रत्येक जण अस्वस्थ आणि संतप्त झाला आहे.

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सतत मास्क घालावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे सरकार सांगत असले तरी लोक त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. सामान्य लोक सोडा राजकीय नेते देखील कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. यावरूनच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये केदारने एक फोटो पोस्ट केला आहे. यात तो म्हणतो, “टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते, त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? आणि हवाय कशाला एवढा फौजफाटा? कुणाला दाखवायचा आहे? किंवा मला वाटतं, एवढीच मंडळी आता त्यांच्यासोबत उरली असावीत!”

यापूर्वीही दिग्दर्शक केदार शिंदेने ट्विटरवर एक ट्विट केले होतं. त्यांच्या या ट्विटनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं.

भविष्यात वीज/गॅस प्रमाणे ऑक्सिजन वापराचं बील आलं तर आश्चर्य वाटायला नको, स्वातंत्र्य म्हणजे मोकळा श्वास पण दुर्दैवाने आपल्या सगळ्याच राज्यकर्त्यांनी तो मोकळा श्वाससुद्धा आपल्याला सहजासहजी उपलब्ध करुन दिला नाही. ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष….., असं ट्विट करत केदार शिंदेंनी प्रशासनावर टीका होती.

केदार यांच्या ट्विटचे काहींनी समर्थन केले आहे तर, काहींनी यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युझर्सने नकारात्मक कमेंट देऊन त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटपटू, राजकीय क्षेत्रातील मंडळींना कोरोनाची लागण होत आहे.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

kedar shinde 1

महत्वाच्या बातम्या – 

‘तुमच्यासारखी मानसिकता असल्यामुळे स्त्रियांवर बलात्कार…

‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, सोशल…

‘कोरोना से डर नही लगता साहब, पंखे से लगता है’,…

सुशांतच्या बहिणीने शेअर केली ‘ती’ शेवटची पोस्ट,…

‘ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष…..’…