बीड | जनतेच्या सुरक्षेसाठी एकीकडे राज्य आणि केंद्र सरकार लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी कोरोना लसीबाबत एक अजब वक्तव्य केलं होतं.
मी दिवसभर फिरतो, मला काय होईन, मी लस बिस घेतली नाही आणि घेणार पण नाही, असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनादरम्यान केलं होतं. त्यानंतर चांगलाच वाद निर्माण आला होता.
कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा, असा सल्ला इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनात दिला होता. त्यानंतर अनेक संघटनांनी इंदोरीकरांचा निषेध देखील केला होता.
अशातच इंदोरीकर महाराजांचं कीर्तन होऊ देऊ नका, अशी मागणी एका शेतकरी पुत्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही मागणी या शेतकरीपुत्राने केली आहे.
काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराजांनी मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे कोरोनाची जनजागृती करणाऱ्यांचं खच्चीकरण झालंय, असं या शेतकरी पुत्राने म्हटलं आहे.
त्यामुळे आता जोपर्यंत इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे.
कोरोना काळात शिक्षीत लोकांनीही चुकीचं वर्तन केलं आहे. शिक्षीत लोकच आपल्याचं परिवारासोबत कोरोना काळात अतिशय चुकीच्या पद्धतीने वागले. त्यांच्याशी फटकारून वागले होेते, अशी भयान परिस्थिती होती, अशातच इंदोरीकरांचं वक्तव्य चुकीचं आहे, असंही या शेतकरी पुत्राने म्हटलं आहे.
इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील सावध पवित्रा घेतल्याचं दिसून आलं होतं. इंदोरीकर महाराजांची भेट घेऊन त्यांची समजूत काढू, असं राजेश टोपे यांनी म्हटलं होतं.
मी स्वत: त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्यांना लसीचं महत्त्व पटवून देतो, असंही राजेश टोपे म्हणाले होते.
दरम्यान, समाज प्रबोधन करण्याचं हे काम गेल्या शेकडो वर्षापासून कीर्तनाच्या माध्यातून करण्यात येत आहे. अशातच आता इंदोरीकर महाराजांचं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवल्याचं देखील दिसून येतंय.
महत्वाच्या बातम्या-
कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं! राज्यभरातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
रोहित शर्मा भारताचा नवा कर्णधार; आयपीएलमध्ये झळकलेल्या ‘या’ चार युवा खेळाडूंची संघात वर्णी
बहुप्रतिक्षित ‘Maruti Suzuki Celerio’ उद्या बाजारात धडकणार; जाणून घ्या किंमत
खवय्यांना महागाईचा दणका! हाॅटेलचं जेवण तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार