कलिंगड घेताना चुकूनही करु नका ‘ही’ चूक, नाहीतर खाल्ल्यावर पडेल खूप महागात!

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसांमध्ये आपल्याला काहीनाकाही थंड खाण्याती फार इच्छा होत असते. तसेच काही जणांना उकाडीच्या दिवसांमध्ये थंडगार फळं खायला फार आवडतात. त्यामध्ये कलिंगड या फळाला सर्वाधिक प्राधान्य आणि पसंती असते.

कलिंगड खाल्याने आपल्या शरिराला खूप फायदे होतात. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरिरातील पाण्याची पातळी स्थिर राहते. त्यामुळे आपली बॉडी नेहमी हायड्रेटेड राहते.

या सगळ्या गोष्टीतर आहेतच. परंतू आपण बाजारात कलिंगड घेताना ते चांगलं आहे की नाही ते पाहून घेतो का? त्याचप्रमाणे कलिंगड घेत असताना कोणत्या गोष्टी तपासून पाहायला हव्यात त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहीती देणार आहोत.

  • अनेकदा कलिंगड लवकर पिकवण्यासाठी त्यावर नायट्रोजनची फवारणी केली जाते. नायट्रोजन हे आपल्या शरिरासाठी घातक असते. ते आपल्या शरिरात गेल्यानंतर ते आपल्या आरोग्यास घातक असते.
  • कलिंगड लाल दिसण्यासाठी क्रोमेट, मेथनॉल यलो, सुडान रेड या केमिकल्सचा वापर केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे घटक आपल्या पोटात गेल्यानंतर आपल्याला फुडपॉईजन होण्याची शक्यता असते.
  • त्याचप्रमाणे कलिंगड पिकवण्यासाठी कार्बाईडचाही वापर केला जातो. ते आपल्या लिव्हर आणि किडनीसाठी धो.कादायक ठरवू शकतं. त्यामुळे कॅन्सर, लैंगिक क्षमता कमी होणं या प्रकारच्या समस्या उद्धभवू शकतात. तसेच आपल्या पचनाक्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो.
  •  कलिंगडावर पांढरी किंवा पिवळ्या रंगाची पावडर दिसत असेल, तर ती आपल्याला धूळ आहे असही वाटू शकतं. परंतू ती कार्बाईड पावडर असू शकते. त्यामुळे कलिंगड खायला घेण्याआधी ते स्वच्छ पाण्याने दोनवेळा धुवून घेतलं पाहिजे.
  • काहीवेळा आपल्याला कलिंगड खाताना ते खूपच जास्त लाल आणि गोड लागत असेल, तर ते केमिकलयुक्त असू शकतं. जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी चव लागत असेल, तर ते कलिंगड खावू नका.

त्यामुळे बाजारातून कलिंगड आणल्या आणल्या ते खायला घेऊ नका. ते कमीतकमी एक-दोन दिवस तसेच राहू द्या. जर ते कलिंगड दोनदिवसांमध्ये खराब झालं नाहीतर ते खाण्याजोगं आहे, असं तुम्ही समजू शकता. जर त्या कलिंगडामधून पांढऱ्या रंगाचं पाणी बाहेर येत असेल, तर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये कॅमिकल्सचा वापर केला आहे. असं झालं नाहीतर तुम्ही ते कलिंगड खाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाची लस घेतल्यानंतर चुकूनही करु नका ‘या’ 5…

जाणून घ्या! चेहऱ्यावरील डाग घालवण्याचे ‘हे’…

राखी सावंत पुन्हा एकदा चढणार बोहऱ्यावर; ‘या’…

भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत रिलेशनशीपच्या चर्चा, अभिनेत्री…

जाणून घ्या! जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यानं होऊ शकतात…