कोरोनाची लस घेतल्यानंतर चुकूनही करु नका ‘या’ 5 गोष्टी, WHOची महत्त्वाची सूचना नक्की वाचा

नवी दिल्ली| जगभरात कोरोना संक्रमणावर नियंत्रण येतंय असं वाटत असतानाच परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होत असल्याचं दिसून येतंय. देशामध्ये कोरोनाचा वेग देखील झपाट्याने वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. भारतासह इतर देशात कोरोना रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. याच संदर्भात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने लस घेतल्यानंतर होणाऱ्या चुकींंबद्दल महत्वाचा सुचना दिल्या आहेत.

कोरोना लसीकरण केंद्रावर लोकांमध्ये केवळ लसीबद्दल जागरुकता केली जात नाही तर लसीकरणादरम्यान घ्यावयाच्या काळजीबद्दलही मार्गदर्शन केलं जात आहे. कोरोना लसीकरणानंतरच्या रिअॅक्शन होणं सामान्य गोष्ट आहे, असं डब्लुएचओनं सांगितलं आहे.

लसीकरणानंतर त्याजागेवर सूज, दुखणं किंवा लाल पडणं ही लक्षण साधारण आहेत. यात ताप येणं, डोकेदुखी, भूक न लागणं आणि अंगदुखी यांचाही समावेश आहे. यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर अधिक परिणाम होत नाही आणि ते लवकरच ठीक होतात. त्यामुळे लस घेतल्यानंतर काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असं देखील डब्लुएचओनं म्हटलं आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर कोणत्या गोष्टी करु नये याच्याही सुचना दिल्या गेल्या आहेत.

1. कोरोना लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारची लस घेऊ नये असा सल्ला देखील देण्यात आला आहे. जर दुसऱ्या प्रकारची लस घेण्याची गरजच असेल तर काही आठवड्याचा कालावधी असणे आवश्यक आहे, असं डब्लुएचओने सांगितलं आहे.

2.  कोरोना लस घेतल्यानंतर शरीरावर काही दिवस टॅटू काढू नये. त्यामुळे रिअॅक्शन होण्याची शक्यता असते.

3. लस घेतल्यानंतर काही दिवस व्यायाम करण्याचं टाळा.

4. कोरोना लस घेतल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. पाण्यामुळे प्रतिकारशक्ति वाढण्यास मदत होते.

5. कोरोना लसीकरणानंतर सर्टिफिकीट जपून ठेवण्याचा सल्ला देखील डब्लुएचओनं  दिला आहे. पुढच्या कालावधीत प्रवास करण्यासाठी किंवा व्हिसा मिळवण्यासाठी याची गरज भासू शकते.

दरम्यान, लसीकरणानंतर अधिक वय असणाऱ्या लोकांना अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे लसीकरणानंतर लोकांनी अर्धा तास केंद्रावरच थांबावं असं सल्ला दिला जात आहे, कारण त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. लसीकरणानंतर अॅलर्जीचं काही लक्षण दिसल्यास किंवा व्यक्तीची तब्येत बिघडल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार करणं शक्य होईल.

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या! चेहऱ्यावरील डाग घालवण्याचे ‘हे’…

राखी सावंत पुन्हा एकदा चढणार बोहऱ्यावर; ‘या’…

भारतीय क्रिकेटर रिषभ पंतसोबत रिलेशनशीपच्या चर्चा, अभिनेत्री…

जाणून घ्या! जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यानं होऊ शकतात…

राजस्थान रॉयल्सचा ‘हा’ खेळाडू बेडरूमचा कॅमेरा…