उद्धवसाहेब, भाजपने सुरू केलेल्या योजना बंद करू नका; रावसाहेब दानवेंचं सरकारला आवाहन

मुंबई |  नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने जुन्या सरकारच्या योजना रद्द करण्याचे प्रकार कित्येकदा होताना दिसून येतात. ठाकरे सरकारने हाच कित्ता पुढे चालवलेला आहे, असा आरोप सध्या होतोय. त्याला कारणही तसंच आहे. ठाकरे सरकारने तत्कालिन फडणवीस सरकारच्या काही योजनांना ब्रेक लावला आहे. तर काही योजनांना सरकार ब्रेक लावण्याच्या तयारीत आहे. यावर भाजप नेते खासदार रावसाहेब दानवे यांनी भाजपने सुरू केलेल्या योजना बंद करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

राठवाडा वॉटर ग्रीड ही तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारची महत्वकांक्षी योजना होती. मात्र याच योजनेला ठाकरे सरकारने ब्रेक लावण्याचे संकेत दिले आहेत. यावरच ही मराठवाड्यासाठीची भाजपने सुरू केलेली अतिशय चांगली योजना आहे. ही योजना थांबवू नका किंवा स्थगित करू नका, असं आवाहन दानवेंनी ठाकरे सरकारला केलं आहे.

जे स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी आणीबाणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यांनी लढा दिला त्यांची पेन्शन सरकारने बंद करू नये, असंही दानवे यांनी सरकारला आवाहन केलं आहे.

दरम्यान, मराठवाडा वॉटर ग्रीड या फडणवीसांच्या योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे ही योजना देखील ठाकरे सरकार बंद करणार का? असा प्रश्न सध्या चर्चिला जाऊ लागला आहे. ही योजना जर ठाकरे सरकारने बंद केली तर भाजप मात्र सरकारला जोरदार विरोध करू शकतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-सुपर ओव्हरमध्ये मी बँटींग करायला जाणार नव्हतो पण….. ; विराट कोहलीने सांगितला किस्सा