‘धर्म म्हणजे काय मला शिकवू नका’; ‘हा’ मराठी अभिनेता ट्रोलर्सवर संतापला

मुंबई| मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचबरोबर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत असतो. गश्मीर महाजनी हा सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो.

अभिनेता गश्मीर महाजनी नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. एवढंच नाही तर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. आता नेहमी प्रमाणे त्यानं आपल्या गोंडस मुलासोबत फोटो शेअर केला आणि याच फोटोमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला.

अभिनेता गश्मीर महाजनीने नुकतंच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या मुलासोबतचे भन्नाट फोटो शेअर केले आहेत. मात्र हे फोटो पाहून काही नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी या फोटोबद्दल आक्षेप घेतला आहे.

अभिनेता गश्मीर महाजनीने नुकतेच आपल्या मुलासोबतचे फोटो शेअर केले आहेत. यात गश्मीर आणि त्याचा मुलगा दोघांनीही पांढरं धोतरं नेसलं आहे. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत. गश्मीरचा दोन वर्षांचा मुलगा व्योम याचं टक्कल केलेलं असून एक शेंडी मात्र दिसत आहे. एका फोटोत गश्मीर ही शेंडी ओढताना दिसत आहे. यावरुनच अनेकांना आक्षेप असल्याचं दिसून आलं आहे.

अनेकांनी या फोटोचा संबंध मुंज या धार्मिक विधीशी जोडला आहे. अनेकांना वाटत आहे की, गश्मीरच्या मुलाची मुंज झाली आहे. त्याने त्याची शेंडी ओढताना काढलेला फोटो हा धर्माचा अपमान होईल असा असल्याचा अनेकांचा आक्षेप दिसून आला. यातल्या एका कमेंटला उत्तर देताना गश्मीरने याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे.

अखेर वाढत्या टीकेला वैतागून त्यानं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “मुळात ही त्याची शेंडी नाही. तो फक्त दोन वर्षांचा आहे. त्याची मुंज झालेली नाही. उन्हाळा म्हणून केस कापले आहेत. बापाला आपल्या मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण आपण बहुतेक आपल्या धर्माचे शिलेदार आहात. पूर्ण माहिती नसताना बेजबाबदार कमेंट करु नका.” अशा शब्दात त्यानं टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं.

त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे ही पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गश्मीर लवकरच प्रेक्षकांना सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा झाला. मराठीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले.

https://www.facebook.com/GashmeerM/posts/300113954819000

महत्वाच्या बातम्या

सोन्याच्या दरात तेजी कायम, वाचा आजचा दर

…अन् म्हशीने सिंहाला शिंगावर उचलून आदळलं; पाहा जबरदस्त व्हिडीओ

काय सांगता! ‘हा’ कावळा चक्क बोलतो, पाहा तर मग नेमकं काय म्हणतोय गजब कावळा?

अन् नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकनं घेतलं स्वतःला मारुन, पाहा व्हायरल व्हिडीओ

वाह रे मजणू! प्रियकर तब्बल 12 तास पाण्याच्या टाकीवर चढून…