अभिनेता सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली ‘ही’ खंत

मुंबई | कोरोना काळामध्ये चित्रपट सृष्टीला खूप मोठा फटका बसला आहे. या काळामध्ये अनेक चित्रपटांची कामं रखडेली होती. परंतू आता कोरोनाची परिस्थिती सावरत असल्यांमुळे सरकारने चित्रपट निर्मितीकरणाला परवानगी दिली आहे. त्यानंतर अनेक चित्रपट, वेब सिरीज रिलीज करण्याता आल्या आहेत.

यामध्ये नुकतीच सिटी ऑफ ड्रिम या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. यामध्ये मराठी अभिनेत्री प्रिया बापटने मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्याबरोबर अनेक मराठी कालाकारही यामध्ये आहेत. त्यापैकी अभिनेता सचिन पिळगावर यांनीही या वेब सिरीजमध्ये काम केलं आहे.

ज्यावेळी या वेब सीरिजचा पहिला सीझन आला होता. त्याचवेळी लोकांनी त्या सीझनला खूप डोक्यावर घेतलं होतं. आणि आताही दुसरा सीझनही प्रेक्षकांना खूप आवडला असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचप्रमाणे या सीझनमधील सगळ्याच कलाकाराच्या कामाचही कौतुक केलं जात आहे.

अशातच सचिन पिळगावकर यांनी यासंदर्भात एक मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी अनेक मनातील गोष्टी बोलल्या आहेत. हिंदी चित्रपट आणि हिंदी सीरीजमध्ये केवळ मराठी व्यक्तीरेखांसाठीच मराठी करलाकारांचा विचार केला जातो. परंती असं न करता सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विचार झाला पाहिजे, असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढे सचिन पिळगावकर म्हणाले की, कलाकार हा कालाकार असतो. त्याच्यावर भाषेच बंधन नसतं. त्यामुळे फक्त मराठी व्यक्तीरेखा आहेत.म्हणून त्या जागी मराठी कलाकार असं नको.

मला अनेक ऑफर्स येतात, परंतू मीच त्या नाकारतो. कारण मला त्याच-त्याच प्रकारच्या भूमिका करायला आवडत नाहीत. मी मराठी आहे आणि मला मराठी भाषेचा अभिमानही आहे. पण जर यावरून लोकांना असं वाटत असेल, तर तसं नाहीयं. मी याआधीही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे.

दरम्यान, सिटी ऑफ ड्रिम या वेब सीरिजचा दुसरा सीझन 30 जूलै रोजी प्रदर्शित झाला आहे. तसेच याच सीरिजचा पहिला सीझन 13 मे 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. या सीरिजमध्ये प्रिया बापट सोबत अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, संदीप कुलकर्णी असे अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

भर मंडपात ब्राम्हणाने नवरीसोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

बिबट्यानं हरणावर केला हल्ला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

पोझ देता-देता महिलेचा अचानक घसरला पाय अन्…, पाहा व्हिडीओ

अचानक कार आली समोर अन्…; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ