मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि एसटी कर्मचारी(ST WORKERS) यांच्यातील गत काही दिवसांपासून चालू असणारा संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच सरकारनं संपकरी (STRIKS) कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणारी लालपरी सध्या रस्त्यावर धावताना दिसत नाही. परिणामी राज्यातील प्रवाशांना प्रचंड मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
संपकरी कर्मचाऱ्यांशी चर्चा चालू असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे. तरीही सध्या विविध आगारातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि सेवा समाप्तीची कारवाई होत आहे.
एकीकडे चिंता करू नका म्हणायचं आणि दुसरीकडे सत्ताबळाचा दुरुपयोग करायचा हा महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा वारंवार उघड झाला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात देखील या आपल्या सरकारने आपल्या निर्लज्जपणाची प्रथा कायम ठेवली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणं सोडाच, काल एका दिवसात या महाभकास सरकारने तब्बल 268 आपल्याच एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचं आवाहन आणि दुसरीकडे निलंबनाची कारवाई, असं दुतोंडी वागताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जराही लाज वाटत नाही?, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलनात सहभागी होण्याच्या हेतूने मुंबईकडे येणाऱ्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांना या हुकूमशाही सरकारने पोलिसांच्या आधारे जेरबंद केल्याचंही पाटील म्हणाले आहेत.
स्वतःच्या खात्यातील समस्या सोडवण्यापेक्षा गृहखात्यात हस्तक्षेप करण्यात जास्त रस असणारे परिवहन मंत्री आपल्या असंवेदनशीलतेचा कळस गाठत आहेत, असा टोला पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना लगावला आहे.
दडपशाही आणि बहिरेपणा कमी करून या सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यावर भर द्यावा, कारण दडपशाहीच्या मार्गाने आक्रोशाचा आवाज कधीही दाबला जात नाही.
एसटी कर्मचाऱ्यांच्या या संघर्षात भारतीय जनता पार्टी शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच असेल. चंद्रकांत पाटील यांनी भाजप एसटी कामगारांच्या लढ्यात अधिक आक्रमकपणे उतरणार असल्याचे संकेत दिलं आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“बैल कितीही आडमुठा असला तरी शेतकरी आपलं शेत नांगरतोच”
घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा
समीर वानखेडेंची बाजू भक्कम, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा दाखला
‘…आता हे सहन होत नाही’; अमृता फडणवीसांचं नवं गाणं सोशल मीडियावर ट्रोल
“कृषी कायदे मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ”