महाराष्ट्र सांगली

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाची तहसीलदाराला मारहाण, हे आहे खरं कारण…

सांगली | तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण केल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार शेळके यांनी चंद्रहार पाटीलच्या अवैधपणे चालणाऱ्या वाळू व्यवसायातील ट्रक जप्त केल्या होत्या, तसेच त्याला साडेसात लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. हा दंड कमी करा, अशी मागणी चंद्रहार गेल्या काही दिवसांपासून करत होता.

नियमाप्रमाणे तुम्हाला सर्व दंड भरावा लागेल, मी तुमचा दंड कमी करु शकत नाही, असं तहसीलदार ऋषीकेश शेळके यांनी चंद्रहारला सांगितलं होतं. त्यामुळे तहसीलदारांबद्दल त्याच्या मनात राग निर्माण झाला होता.

अखेर रविवारी दुपारच्या सुमारास विटा तहसील कार्यालयात चंद्रहार आणि त्याच्या साथीदाराने तहसीलदारांना मारहाण केली. याप्रकरणी शेळके यांनी विटा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे शहर आणि जिल्ह्यात दारुची दुकाने सुरु होणार का?; आला महत्त्वाचा निर्णय

-जागा चार, नावं सात… ‘या’ नावांपैकी भाजप नेमकी कुणाला देणार संधी?

-काय सांगता??? फेसबुकवर आता चक्क पैसे कमवण्याची संधी

-ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

-“मुंबई-पुण्यातील शेतकरी, मजुरांच्या मुलांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा”