मुंबई | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात (Share Market) चढ-उतार सुरू असल्याचं दिसत आहे. आज शेअर बाजारात किंचित घट झाल्याचं पहायला मिळालं आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पेनी स्टॉक्स खूप मोहक असतात. त्यामुळे अनेक तज्ज्ञ या पेनी स्टाॅक्सच्या मोहात पडू नये, असा सल्ला देतात.
पेनी स्टॉक्सने या साठ्यांमधून मिळणारा भरघोस परतावा आणि कमी किंमतीमुळे ते बहुधा हे शेअर्स मल्टीबॅगरही ठरू शकतात. त्यामुळे अनेकांना मोठ्या संधी देखील यामधून मिळते.
असाच एक स्टॉक म्हणजे RTCL. जो पेनी स्टॉकच्या श्रेणीत येऊ शकतो, परंतु या स्टाॅकने केवळ दोन आठवड्यांत गुंतवणूकदारांना 135 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
RTCL चा शेअर 27 डिसेंबर 2021 रोजी 8.51 रुपयांवर बंद झाला. तर शुक्रवारी म्हणजेच 13 जानेवारी रोजी शेअरची बंद किंमत 19.91 रुपये आहे. म्हणजेच अवघ्या दोन आठवड्यांत या शेअरने 135 टक्क्यांचा रिटर्न्स दिला आहे.
RTCL चा स्टॉक मागील सलग 4 सत्रांमध्ये 10 टक्क्यांच्या वरचा सर्किट दाखवला आहे. एकट्या गेल्या 5 सत्रांमध्ये या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 90% परतावा दिला आहे.
दरम्यान, जर एखाद्यानं महिन्यापूर्वी RTCL च्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची गुंतवणूक 2.50 लाख रुपये झाली असती.
महत्त्वाच्या बातम्या –
संजय राऊत म्हणतात,”चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ, त्यांच्या चष्म्याचा नंबर…”
“…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; प्रताप सरनाईक यांचं रोखठोक वक्तव्य
राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख