Top news मनोरंजन

सुशांतला न्याय मिळणार का याबाबत साशंकता?; जिजाने शेअर केला ‘हा’ फोटो

मुंबई | तीन महिन्यांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आ.त्मह.त्या की त्यांची ह.त्या झाली, ते अजून माहित नाही. पण या घटनेला तब्बल तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहे. सुशांत यांच्या केसमध्ये रोज नव-नवे पैलू समोर येत आहे.

सुशांत सिंह राजपूत मृ.त्यू प्रकरणाचा तपास मोठ-मोठ्या अन्वेषक संस्था करत आहे. सीबीआय, ईडी, एन.सी.बी सारख्या संस्था आपापल्या पद्धतीने या घटनेचा तपास करत आहे. पण अजूनही त्यांना यात यश आलेले नाही.

सुशांत सिंह राजपूत यांनी आ.त्मह.त्या केली की त्यांची ह.त्या झाली आहे, याचा कोणताच पुरावा अजून कोणाच्याही हाती लागलेला नाही. आता ही केस सोडवताना ती बॉलिवूडमधील ड्र.ग्ज कनेक्शनपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

यातच आता सुशांत केसबाबत त्यांच्या कुटुंबातील सर्वजण चिंतेत आहे. त्यातच सुशांतचा दाजी विशाल सिंह यांनी या केसवर आपली चिंता व्यक्त केली आहे. विशाल सिंह यांनी सुशांतचा जुना फोटो टाकून त्यासोबत एक पोस्ट लिहिली आहे.

विशाल सिंह यांनी पोस्टमध्ये लिहिलंय,”आपण अंतिम रेषेजवळ आहोत का? सुशांतला न्याय मिळेल का? त्याचा साधा चेहरा दिवसाच नाही तर आमच्या स्वप्नातही आता रोज येऊ लागला आहे.” विशाल सिंह यांच्या पोस्टने केस कधीही संपणार नाही, याकडे इशारा करत आहे.

सुशांतच्या केसबाबत काही दिवसांपूर्वी एम्सच्या मेडिकल टीमने एक अहवाल सादर केला होता. यात त्यांनी सांगितले होते की, अभिनेत्याला कोणतेही वि.ष दिले गेले नाही. यावरून सुशांतच्या कुटुंबाने रिया चक्रवर्तीवर लावलेला आ.रोप सिद्ध होत नाही.

एम्सच्या मेडिकल टीमने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना क्लीन चिट दिलेली नाही. त्यांनी शवविच्छेदन फॉर्म अर्धवट अहवाल दिला होता, त्यामुळे आता शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांवर प्रश्न उपस्थित होत आहे.

त्यातच आता एन.सी.बीने सुशांतच्या केसमधील ड्र.ग्ज कनेक्शनचा तपास करत आहे. यात त्यांनी अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर सारख्या दिग्गज बॉलिवूड कलाकारांची चौकशी केली आहे. सध्या ही केस नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे आणि मृ.त्यूचा गुंता कधी सुटेल, हे आता येणारी वेळच ठरवेल.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माने आयपीएलमध्ये रचला नवा रेकॉर्ड, विराट कोहलीलाही टाकलं मागे!

अंकिता लोखंडेनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, सुशांतच्या चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

बिग बॉसच्या सर्वात महागड्या स्पर्धकांमध्ये राधे माँ; रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील!

करण जोहरसह डझनभर कलाकारांचं टेंशन वाढलं, ‘या’ प्रकरणात नव्याने होणार चौकशी?

भारताचा ‘हा’ युवा खेळाडू तळपला; विराट-रोहितचा तुफानी फिफ्टीचा रेकॉर्ड तोडला