Top news मनोरंजन

करण जोहरसह डझनभर कलाकारांचं टेंशन वाढलं, ‘या’ प्रकरणात नव्याने होणार चौकशी?

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला एनसीबीनं ता.ब्यात घेतलं होतं. रियाच्या अट.केनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज एनसीबीच्या रडारवर आले आहेत.

सुशांत प्रकरणात अनेक बॉलिवूड मधील कलाकारांची नावे समोर येऊ लागल्यानंतर 2019 मधील करण जोहरच्या एका पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड मधील अनेक कलाकार न.शेत दिसत होते. हा व्हिडिओ करण जोहरने शूट करत स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांबर शेअर केला होता.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या पार्टीमध्ये कलाकारांनी ड्र.ग्ज घेतलं असल्याची चर्चा रंगली होती. आता एनसीबी या व्हिडिओचा तपास करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. माहितीनुसार एनसीबी या पार्टीमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व कलाकारांना समन्स पाठवू शकते तसेच चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात देखील बोलावू शकते.

व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी हा व्हिडिओ एनसीबीनं दिल्लीला पाठवला आहे. करण जोहरच्या या व्हिडिओची सत्यता यापूर्वीही पडताळण्यात आली होती. त्यावेळी हा व्हिडिओ खरा असल्याचा समोर आलं होतं. मात्र एनसीबीनं हा व्हिडिओ पुन्हा एकदा तपासासाठी पाठवला असल्यानं पुढील अहवाल काय येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एनसीबी तपासात हा व्हिडिओ खरा आढळल्यास बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांच्या अडचणी वाढणार आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओतील पार्टीमध्ये दीपिका पादुकोन, अर्जुन कपूर, विकी कौशल, मलाईका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, असे इतर बरेच कलाकार न.शेत दिसत आहेत. करण जोहरनं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया सुद्धा दिली होती.

मी आत्तापर्यंत केव्हाच कोणत्या ड्र.ग्ज पार्टीचं आयोजन केलं नाही. तसेच मी दिलेल्या कोणत्याच पार्टीत केव्हाच ड्र.ग्ज आणले देखील गेले नाहीत किंवा कोणी ड्र.ग्जचं सेवन देखील केलं नाही, असं करण जोहरनं म्हटलं होतं.

दरम्यान, रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमध्ये सीबीआयला अं.म.ली पदार्थांचा उल्लेख आढळला होता. यानंतर एनसीबीनं रियाला ता.ब्यात घेत अं.म.ली पदार्थ प्रकरणी शोध सुरू केला होता. आता अभिनेत्री श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर आणि सारा अली खान यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत.

तसेच अभिनेता शाहरुख खान, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर आणि डिनो मोरिया या बड्या कलाकारांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणी या बड्या कलाकारांची नावे समोर आल्यानं इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताचा ‘हा’ युवा खेळाडू तळपला; विराट-रोहितचा तुफानी फिफ्टीचा रेकॉर्ड तोडला

तो अशक्यप्राय विजय कसा मिळवला???; दिनेश कार्तिकनं सांगितली राज की बात!

महिंद्राने लाँच केली बहुचर्चित SUV थार; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

सुशांत-दिशा प्रकरणी अमित शहांचं नितेश राणेंना पत्र; पत्रात म्हणाले…

“सुशांत सिंह राजपूतची ह.त्या करण्यात आली होती की सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती?”