पुणे : शिवसेनेची ‘जन आशिर्वाद यात्रा’ आणि भाजपची ‘महाजनादेश यात्रा’ या नुकत्याच पार पडल्या. त्याच पार्श्वभूमीवर शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सेना-भाजपच्या यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी असून राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ ही रयतेचा आवाज बुलंद करण्याची आहे, असा हल्लाबोल गुरुवारी खासदार अमोल कोल्हे यांनी सतत्ताधाऱ्यांवर केला आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नी पालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याबरोबर दोन तास बैठक घेतल्यानंतर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यानेच राज्यात गुन्हेगारीत वाढ झाल्याचंही अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेनंतर त्यांनी गृहमंत्री पदावरुन निशाणा साधला आहे.
पक्षातील नेते गेले असले तरीही पक्ष इमारतीच्या तळातील मजबूत वीट असलेले कार्यकर्ते असल्याने राष्ट्रवादी इमारत ढासळणार नाही, असा विश्वास त्यांनी पक्षाच्या आऊटगोईंगवर केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तनाच्या वाटेवर आहे, असंही अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उदयनराजेंना ‘शिवस्वराज्य यात्रे’ची कल्पनाच नाही???
…म्हणून मी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात आलो- आमदार शिवेंद्रराजे भोसले
…तर फडणवीस साहेब, तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही!
-विजय वडेट्टीवार यांचा शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट! राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ
-जितेंद्र आव्हाडांच्या बोचऱ्या टीकेला शिवेंद्रराजेंचं खरमरीत प्रत्युत्तर!