डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर!

नाशिक | डॉ. सुवर्णा (Dr. Suvarna Waje) वाजे यांच्या जळीतकांडाप्रकरणी रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांना पतीने अतिशय थंड डोक्याने क्रूरपणे संपवलं आहे. त्यासाठी नियोजनबद्ध रितीने कट केला. डॉ. सुवर्णा वाजे 25 जानेवारीच्या रात्री काम संपवून क्लिनिकमधून बाहेर पडल्या. त्या मुंबई-आग्रा महामार्ग परिसरालगत पोहोचल्या.

हे सारं त्यांच्या मोबाइल लोकेशनवरून समोर आलं आहे. आता पोलिसांनी तपा केलेल्यासात त्याच दिवशी रात्री डॉ. सुवर्णा वाजे ज्या वेळेस त्या भागात पोहचल्या होत्या, त्यावेळेस संदीपही तेथे असल्याचं समोर येत आहे.

संदीपच्या मोबाइलचं लोकेशनही त्यादिवशी मुंबई-आग्रा महामार्ग परिसरात आढळलं आहे. त्यामुळे संदीप भोवतीचा फास आणखी एकदा घट्ट झाला आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांना संदीपने एकदा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी ही सारी माहिती क्लिनिकमधील सहकाऱ्यांना सांगितली होती. संदीपकडे पोटगीसाठी पन्नास लाखांची मागणी केल्याचीही माहिती दिली होती.

आपलं कधी काही बरं वाईट झालंच, तर क्लिनिकमध्ये ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना द्या, असं सांगितलं होतं. त्यावरून डॉ. सुवर्णा वाजे यांच्या सहकाऱ्यांनी ही माहिती आणि चिठ्ठी पोलिसांना दिली आहे. त्यातून या साऱ्या प्रकरणाचा अजून खोलवर उलगडा झाला आहे.

दरम्यान, डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता.

25 जानेवारी रोजीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केलं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलंही टेन्शन नव्हतं. यादिवशी बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा फोन पती संदीपलाच केल्याचं समोर आलं. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली आणि मास्टरमाईंड असलेल्या संदीप वाजेलाच बेड्या ठोकल्या.

महत्वाच्या बातम्या- 

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; एका दिवसात झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान 

“महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात” 

राष्ट्रवादीला मोठा झटका, ‘इतक्या’ नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

रूपाली पाटलांची किरीट सोमय्यांवर टीका, म्हणाल्या, ‘लबाड लांडगा…’ 

“…तर मीही अण्णा हजारेंसोबत उपोषणाला बसेल”