महाराष्ट्रातली परिस्थिती चिंतेची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- केंद्रिय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली |  देशातली सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. यासंबंधी केंद्रिय आरोग्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसंच याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा  करणार असल्याचं सांगितलंय.

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात, यासंबंधी केंद्रिय आरोग्यमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये भर पडत आहे. मुंबई-पुणे-नागपूर-नाशिकनंतर कोरोनाने ग्रामीण भागात देखील विळखा घातला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक स्थिती चिंताजनक आहे. 36 पैकी 34 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचं डॉ. हर्षवर्धन म्हणाले आहेत. एएनआयने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 841 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,525 वर गेली आहे. काल राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-शाहू राजांचा फडणवीसांकडून कार्यकर्ता म्हणून उल्लेख; ट्रोल झाल्यावर पोस्ट केली डिलीट

-….तरच दारूविक्री सुरू ठेवावी- पृथ्वीराज चव्हाण

-कोरोनाने देशातला विक्रम मोडला; आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण तसंच मृत्यूंची नोंद…!

-पुण्यातील ‘गोल्ड’मॅन कायमच हरले आयुष्याची लढाई

-कोरोना नियंत्रणात येईपर्यंत आम्हाला एकही सुट्टी नको म्हणणाऱ्या 2 पोलिसांच्या पाठीवर गृहमंत्र्यांची कौतुकाची थाप!