Top news देश

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन यांची प्रकृती स्थिर

नवी दिल्ली |  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काल रात्री दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

त्यांच्या प्रकृतीविषयी देशभरात चिंता व्यक्त करण्यात येत होती. तसंच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देशभरात प्रार्थना देखील केली जात होती. आता त्यांच्या तब्येतीविषयी नवी माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं एम्समधल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली असल्याचं एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. एएनआयने ट्विट करत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं ट्विटरद्वारे सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ कारणामुळे अभिनेत्री पूनम पांडेला घराबाहेर जाणं महागात पडलं

-मुख्यमंत्र्यांचा विधान परिषदेचा अर्ज दाखल; ठाकरे कुटुंबाची विधान भवनात हजेरी

-“कॉंग्रेसने सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकाऱ्याला संधी द्यायला हवी होती”

-‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचं होतं, काँग्रेसच्या भूमिकेचं सामनामधून कौतुक

-“कतरिना माझ्याकडे आली अन् मिठी मारुन मला म्हणाली…”