मोठी बातमी : लवकरच कोरोनावरील औषधाचा शोध लागणार!

नवी दिल्ली | कोरोना विषाणूने जगभर थैमान घातला आहे. बलाढ्या देशांसह भारतही या आजारासोबत दोन हात करत आहे, मात्र हा आजार नियंत्रणात येत नसल्याचं दिसतंय, अशा वातावरणात आता संपूर्ण जगाला दिलासा देणारी बातमी आली आहे. कोरोनावरील औषधाचा लवकरच शोध लागेल, अशी माहिती पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली आहे.

चीनमधील वुहान शहरात कोरोनानं अक्षरशः हाहाकार केला. हा संपूर्ण भाग बंद करावा लागला. हळूहळू हा विषाणू जगभर पसरत आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसोबत हा विषाणू अनेक देशांमध्ये पसरत आहे.

परदेशातून येणाऱ्या भारतीय तसेच विदेशी नागरिकांसोबत हा आजार भारतात देखील आला आहे. विमानतळांवर पुरेशी खबरदारी घेण्यात येऊनही या आजारानं भारतात शिरकाव केला.

कोरोना हा विषाणू नवा विषाणू असल्यानं त्यावर सध्यातरी कुठलंही औषध उपलब्ध नाही, मात्र जगाला त्रस्त करणाऱ्या या आजारावर औषध शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. शास्त्रज्ञ कोरोनाची लस शोधण्यासाठी दिवसरात्र एक करत आहे.

भारतातील पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना महत्त्वाची माहिती दिली आहे. शास्त्रज्ञांना कोरोनाचा विषाणू शरीराबाहेर ठेवण्यात यश मिळालं आहे. सध्या विविध कंपन्यावर यावर टेस्टिंग करत असून कोरोनावर कुठलं औषध लागू होतं हे लवकरच कळेल, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉ. गंगाखेडकर यांच्या या माहितीमुळे धास्तावलेल्या अनेकांना दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अखेर डोनाल्ड ट्रम्पही पडले नमस्काराच्या प्रेमात!

-तर पुढील आठवड्यात पेट्रोल 70 रूपये लिटर होवू शकत…

-जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; खा. डॉ. अमोल कोल्हेंची संसदेत मागणी

-शाळा बंद पण दहावी-बारावी बोर्डाचे पेपर मात्र ठरलेल्या वेळेतच मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

-कोरोना व्हायरसने उडवली क्रिकेटची दांडी; भारत-आफ्रिका वनडे मालिका केली रद्द