सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण; आ.त्मह.त्या केली, असा अहवाल देणारा डाॅक्टर आला अडचणीत!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सीबीआय टीम सुशांत प्रकरणी शोध घेत आहे. तसेच दिल्लीतील एम्स रुग्णालयाची मेडिकल टीम सुद्धा सुशांत प्रकरणातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत होती.

सुशांतच्या सर्व फोरेन्सिक रिपोर्टची फेरतपासणी करत सुशांत सिंह राजपुतची ह.त्या झाली नाही तर सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे, असा अहवाल एम्सच्या टीमनं दिला आहे. सुशांत सिंह राजपूतची ह.त्या झाली असावी, या शक्यतेला एम्सच्या टीमनं नकार दिला आहे. मात्र, आता सुशांतच्या मृ.त्यूसंबंधित अहवाल देणारे डॉ. सुधीर गुप्ता अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. सुधीर गुप्ता यांची एक ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये सुधीर गुप्ता स्वतः सुशांतनं आ.त्मह.त्या केली नसून सुशांतची ह.त्या करण्यात आली होती, असा दावा करत आहेत. मात्र, सुधीर गुप्ता यांनी सुशांत प्रकरणी जे रिपोर्ट्स सीबीआयकडे सोपविले आहेत त्यामध्ये त्यांनी सुशांतनं आ.त्मह.त्या केल्याचं म्हटलं आहे.

व्हायरल झालेली ऑडीओ क्लिप ही सुशांतच्या मृ.त्यूचे फोटो ज्यावेळी डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे आले त्यावेळची असल्याचं बोललं जात आहे. सुशांतच्या मृ.त्युनंतर सुशांतचे फोटो सर्वप्रथम तपासासाठी माझ्याकडे आले होते. त्यावेळी मला फोटो पाहून सुशांतची ह.त्या करण्यात आली आहे, असं वाटलं होतं, असं सुधीर गुप्ता यांनी या क्लिपमध्ये म्हटलं होतं.

सुधीर गुप्ता यांनी सुशांत प्रकरणात यु टर्न घेतला आहे असं काही लोकांचं म्हणनं आहे. यामुळे सुधीर गुप्ता यांना त्यांच्या बदलत्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आरोग्यविषयक कामाची संसदीय समिती याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावू शकते, अशी माहिती मिळाली आहे.

भाजप नेता सुब्रामण्यम स्वामी यांनीही सुशांत प्रकरणी सुधीर गुप्ता यांच यु टर्न घेण्याचा मुद्दा संसेदेत उचलला असल्याचं सांगितलं होतं. तसेच सुशांत प्रकरणी सीबीआयनं 302 कलम लावावं, अशीही मागणी सुब्रामण्यम स्वामी यांनी केली होती.

दरम्यान, सुशांत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सध्या एनसीबीच्या रडारवर आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा आली खान, नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोण तसेच अभिनेता शाहरुख खान, अर्जुन रामपाल, रणवीर कपूर यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. एनसीबी या कलाकारांवर पुढे काय कारवाई करेल, हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Bigg Boss 14 | लग्न केल्यानंतरही पारस छाबडासोबत रिलेशनमध्ये होती पवित्रा पुनिया?

सर रविंद्र जडेजाचा भीमपराक्रम; अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!

#BigBoss14 | वाचा सुखविंदर कौर कशी बनली राधे माँ; फारच रंजक आहे कहानी

सलमान खूप गोड आहे म्हणत दिशा पटानीचा सलमानला ‘या’ गोष्टीसाठी होकार

पंजाबचा दारुण पराभव केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं केला मोठा खुलासा म्हणाला…