काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणाचं गूढ उकललं!

नाशिक | डॉ. सुवर्णा वाजे खुनप्रकरणाचं गूढ अखेर उलगडलं आहे. पोलिसांना (Police) कारमध्ये जळालेल्या हाडांचा ‘डीएनए’ अहवाल मिळालेला असून, ही हाडं डॉ. सुवर्णा वाजे यांचंच असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे त्यांना एकूण सहा जणांनी मिळवून संपवलं. या संपूर्ण प्रकरणामागचा सूत्रधार हा डॉ. वाजे यांचा पती संदीप वाजे असल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

संदीपने अतिशय थंड डोक्याने नियोजनबद्ध पद्धतीने डॉ. वाजे यांना संपवले असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या या क्रूरतेने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता.

25 जानेवारी रोजीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केलं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलंही टेन्शन नव्हतं. यादिवशी बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा फोन पती संदीपलाच केल्याचं समोर आलं. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली आणि मास्टरमाईंड असलेल्या संदीप वाजेलाच बेड्या ठोकल्या.

डॉ. सुवर्णा वाजे आणि पती संदीप वाजे यांचे पटत नव्हते. त्यामुळेच संदीपने हा टोकाचा निर्णय घेतल्याचं समजतं. त्यांच्यात वारंवार कौटुंबिक कलह सुरू होता. पती आणि पत्नींमध्ये नेहमी खटके उडायचे.

महत्वाच्या बातम्या- 

“राज्यात सत्ता आमचीच तरी नितेश राणेंसाठी सॉफ्ट कॉर्नर दाखवला” 

“राहुल गांधींनी तीर सोडला आणि सत्ताधारी घायाळ झाले” 

राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात बड्या अधिकाऱ्याचा सर्वात धक्कादायक खुलासा! 

मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा- अमृता फडणवीस 

टीम इंडियाचा नवा Test Captain कोण?, सौरव गांगुलीने स्पष्टचं सांगितलं