महाराष्ट्राला हादरवलेल्या डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

नाशिक | डॉ. सुवर्णा वाजे-जाधव बेपत्ता होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. 25 जानेवारी मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती.

अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. ती हाडे आणि तो मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचाच आहे का, हे तपासण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली होती. त्यात वाजे कुटुंबीय आणि गाडीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए एकच असल्याचं निष्पन्न झालं होतं. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

डॉ. सुवर्णा वाजे (Dr. Suvarna Waje) यांना खुनानंतर सॅनिटायझर टाकून जाळल्याची कबुली बाळासाहेब ऊर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के याने कोर्टात (Court) दिली आहे. म्हस्के हा मुख्य संशयित आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपचा मावसभाऊ आहे.

मुख्य संशयित संदीप वाजेचा साथीदार म्हस्केची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने ही कबुली दिली. आता त्याला 28 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

संशयित म्हस्केने आपल्या पत्नीचा आत्महत्येस प्रवृत्त करण्याचपर्यंत छळ केला होता. तसाच सल्ला त्याने आपल्या मावसभावाला दिला. मात्र, डॉ. सुवर्णा वाजे पतीच्या छळाला पुरून उरल्या. तेव्हा त्याने त्यांचा खून केला असावा, अशी शक्यताय.

डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपच्या कारमधून पोलिसांनी चाकू जप्त केलाय. मात्र, संदीप काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे डॉ. वाजे यांचा खून कसा झाला, कसा केला हे अजून समोर आलं नाही. मात्र, खुनानंतर संशयिताने त्यांना जाळल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

संकटकाळी युक्रेनच्या लोकांना येतीये ‘या’ महिलेची आठवण; रशिया फक्त नावानेच थरथर कापायचा 

रशिया-युक्रेन युद्धाचा मद्यप्रेमींनाही झटका; आली ही महत्त्वाची माहिती समोर

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सुचना!

“संजय राऊतांची मानसिक स्थिती खराब झालीये हीच आत्ताची ब्रेकिंग न्यूज”

Russia-Ukraine War: युक्रेनसोबत रशियाचं नेमकं भांडण काय?, वाचा सविस्तर