मुंबई | दक्षिण अफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्सची तुलना जगातील अनेक दिग्गज खेळाडूंसोबत होते. आधुनिक काळातील क्रिकेटच्या दुनियेत कायापालट करण्याचं काम एबी डिव्हिलियर्सने केलं आहे.
अंगकाठीने फ्लेझिबल अशा एबीने स्कूप शॉट, रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिट शॉट क्रिकेटला दिले आहेत. त्यामुळेच एबी डिव्हिलियर्सची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते.
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतक, शतक आणि 150 धावा देखील डिव्हिलियर्सच्या नावावर आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये 9 हजार धावा आणि सलग 12 कसोटीत अर्धशतकं पूर्ण करणारा दुसरा खेळाडू आहे.
14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेला अनेक संस्मरणीय विजय मिळवून देणाऱ्या डिव्हिलियर्सचा आज वाढदिवस (AB De Villiers Birthday) आहे.
डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्ध 31 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला होता. असे अनेक मोलाच्या धडाकेबाज इनिंगमळे एबी आजही सर्वांचा लाडका आहे. मात्र, 2019 ला डिव्हिलियर्सचं स्वप्न भंगलं होतं.
2019 विश्वचषकाच्या सेमीफायनल स्पर्धेत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगला होता. त्यावेळी दक्षिण अफ्रिकेची टीम पुर्ण तयारीनिशी मैदानात आली.
त्यावेळी रोमांचक स्थितीत म्हणजेच अखेरच्या ओव्हरमध्ये रंगात आलेला सामना न्यूझीलंडने जिंकला होता. त्यावेळी एबी डिव्हिलियर्ससह दक्षिण अफ्रिकेचे फलंदाज भर मैदानात ढसाढसा रडले होते.
दरम्यान, क्रिकेटचे अनेक चाहते यावेळी रडले देखील होते. मात्र, त्यानंतर एबीने टीमला मजबूत आधार दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी
तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स
“शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल, तेव्हा…
“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”