Top news आरोग्य

उन्हाळ्यात झटपट वजन कमी करायचंय?; ‘या’ दोन गोष्टी नक्की ट्राय करा

overweight e1645108969201
Photo Credit - pixabay

मुंबई | उन्हानं आता सर्वांच्या अडचणीत भर टाकायला सुरूवात केली आहे. सर्वत्र सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याचं दिसत आहे.

उन्हाळा आला की डाॅक्टर अनेक उपाय सुचवत असतात. उन्हाचा घातक परिणाम सर्वांच्या आरोग्यावर होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. अशातच आरोग्याच्या अनेक समस्या देखील जाणवायला लागल्या आहेत.

सर्वाधिक जास्त प्रमाणात उन्हाळ्यात पचनाची समस्या जाणवते. सतत तहान लागणे आणि थकवा येणे यामुळं शरिरातील ऊर्जा वाया जाते. अशात काही उपाय करणे गरजेचे आहे. जे उपाय इतरही अनेक शारिरीक उणीवा भरून काढतात.

उन्हापासून संरक्षण म्हणून आपण शितपेय पितो. लिंबू सरबत आणि नारळाचं पाणी पिण्याचं प्रमाण देखील उन्हाळ्यात वाढतं. यामुळं चरबी कमी होण्यासही मदत होते.

लिंबू पाणी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन-सी, सायट्रिक अॅसिड, ल्फेव्होनाॅइड्स अशा उपयुक्त घटकांचा समावेश लिंबू पाण्यात असतो. परिणामी शरिराची चरबी कमी होण्यास मदत होते.

नारळ पाणी हे देखील फायदेशीर आहे. प्रोटिन, फायबर, पोटॅशियम, जीवनसत्वे, खनिजे, अमिनो अॅसिड आणि अॅंटी ऑक्सिडंट अशा प्रकारचे गुणधर्म असतात.

दरम्यान, उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यात आणि लठ्ठपणा कमी करण्यास नारळ पाणी आणि लिंबू पाणी हे दोन्ही मदत करतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

Gold Silver Rate: सोनं-चांदी पुन्हा महागलं; जाणून घ्या आजचे ताजे दर

“गजा मारणेचंही स्वागत झालं होतं, मग तो काही आदर्श पुरूष आहे का?”

“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??, कारवाई झाली की बोंबलायचं अन्…”

ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…

नितेश राणेंच्या अडचणी वाढणार?; पोलिसांनी मोठं पाऊल उचललं