देशात ‘कोरोना’चा सहावा बळी; पाटणामध्ये एकाचा मृत्यू

पाटणा | देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 6 वर पोहोचला आहे. आज बिहारमधील पाटणामध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 2, कर्नाटक, दिल्ली, पंजाबमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एएनआयने या याबाबतची माहिती दिली आहे.

बिहारमधील पाटणामध्ये एका 38 वर्षीय तरुणाचा  एम्स रुग्णालयात मृत्यू झाला आहे. हा तरुण कतारमधून बिहारमध्ये आला होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती.

पाटणामधील एम्स रुग्णालयात एका तरुणाचा किडनी फेलमुळे मृत्यू झाला. हा मृत तरुण कोरोनाबाधित होता. तो पाटणामधील मंगर गावात राहणार आहे. दोन दिवसांपूर्वी तो कोलाकातामधून त्याच्या गावी परतला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

 

महत्वाच्या बातम्या – 

-जनता कर्फ्यूच्या दिवशी राजू शेट्टींनी काय केल? पहा व्हिडीओ

-खासदारांनो दिल्लीला जाऊ नका, महाराष्ट्रातच थांबा आणि सरकारी यंत्रणांना कोरोना विरोधात लढण्यास मदत करा – शरद पवार

-“संपूर्ण बॉलिवूडने कनिका कपूरवर बहिष्कार टाकावा”

-करोनाबाधित 75 शहरं लॉकडाऊन करा; मोदी सरकारचे राज्यांना आदेश

-महाराष्ट्र लॉकडाऊन मात्र… ‘या’ गोष्टींची दुकाने चालू राहणार!