पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शीळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी 14 जून मंगळवार रोजी देहू येथे येणार आहेत.
लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी दुपारी 2 वाजता सभा घेणार आहेत. मोदींच्या देहू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत असून देहूला छावणीचं स्वरूप आलं आहे.
सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या प्रश्नामुळे मुख्य मंदीर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. केवळ पासधारकांनाच मंदीर परिसरात प्रवेश मिळणार आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड ऑडनन्स फॅक्टरी कमान ते गाव रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्यासाठी निगडीतील भक्तीशक्ती चौक व त्रिवेणी नगर तळवडे कॅनबे चौक हा पर्यायी रस्ता असेल.
तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक महिंद्रा सर्कल रस्ता देखील मोदींच्या देहू दौऱ्यादरम्यान बंद राहणार आहे. तर यासाठी मोईगाव मार्गे निघोजे एमआयडीसी व तळवडे गावठाण-चिखली ते डायमंड चौक असा पर्यायी मार्ग सुरू राहणार आहे.
इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान देहू नगरीत येणार असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात पंतप्रधान मोदींचं देहू येथे स्वागत करण्यात येणार आहे.
दरम्यान, 10 उपायुक्त, 20 सहाय्यक आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 295 सहाय्यक निरीक्षक व 2270 कर्मचारी तैनात आहेत. तर सोबतच एसपीजी, एनएसजी, सीआरपीएफ, एसआरपीएफ जवान देखील तैनात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“घर मे बैठा नकली, अयोध्या जा रहा है असली”
“राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या, आगे आगे देखो होता है क्या”
डॉ. प्रकाश आमटेंची कॅन्सरशी झुंज; तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
सदाभाऊ खोत यांच्याकडून अखेरच्या क्षणी माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?
“मुख्यमंत्री वेळच देत नाहीत, आमचा एकच आधार ते म्हणजे अजित पवार”