पुणे | राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक यंत्रणा आपल्या पद्धतीने कार्य करत आहे. सरकार सर्व पक्षांना आणि स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन कार्य करण्यावर भर देत आहे.
राज्यातील महत्त्वाचं शहर म्हणून ओळख असलेलं पुणे शहरात कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. परिणामी पुणे महापालिका प्रशासनानं जलद गतीनं कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत.
रेल्वे स्थानकांवर बाहेरून येणाऱ्या खास करून बाहेर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांनी स्क्रीनिंग चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीला प्रत्यक्षात आता सुरूवात झाली आहे.
नागरिकांना आता चाचणी करण्यासाठी तपासणी केंद्रावर जाण्याची गरज नाही. घरच्या घरी चाचणी करता येणार चाचणी किट बाजारात उपलब्ध झालं आहे. नागरिकांमध्ये या किटची मागणी वाढली आहे.
आयसीएमआरची मान्यता असल्यानं या किटला मागणी वाढली आहे. चाचणी पाॅझिटीव्ह आली तर घरच्या घरी काळजी घेऊ शकता. पण अधिकचा त्रास होत असेल तर डाॅक्टरांशी संपर्क साधण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
टेस्ट करून चाचणी पाॅझिटीव्ह आली तर याबाबत आरोग्य विभागाला कळवावं असं पुणे फार्मासिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलेकर यांनी म्हटलं आहे. पुणे भागात सध्या लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे.
पुणे ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढत असल्याचं सध्या चित्र दिसत आहे. बारामतीमध्ये कोरोना आकडेवारीत झपाट्यानं वाढ होत आहे. बारामती तालुक्यात गेल्या दोन दिवसांमध्ये 144 रूग्ण वाढले आहेत.
दरम्यान, कोरोना रूग्णसंख्येत वाढ होवू नये म्हणून सरकारकडून विविध क्षेत्रांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. पालिका प्रशासन आणि राज्य सरकार मिळून पुण्यातील रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख
5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग
श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक
भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…