कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘या’ चित्रपटाचे प्रदर्शन गेले लांबणीवर

मुंबई |  गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय.

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याच पाश्वभूमीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. तसेच कडक निर्बंधही लागू केले आहेत. मात्र या सगळ्याचा परिणाम सर्व उद्योग-धंद्यावर होत आहे. याचबरोबर याचा परिणाम आता सिनेमासृष्टीवरही पडत असल्याचं दिसतं आहे.

जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर अनलॉक निमयाअंतर्गत चित्रपट गृहे सुरू झाली होती. तसेच खूप नव-नवीन चित्रपट खूप दिवसांच्या गॅपनंतर प्रेक्षकांना पहायला मिळणार होते. परंतू पुन्हा सरकारने राज्यात लॉकडाऊन केल्यानं हे सगळं पुन्हा बंद करावं लागणार आहे.

यामध्ये प्रदर्शित होण्याऱ्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आलं आहे. बहुचर्चित असलेला मराठी चित्रपट झिम्मा या चित्रपटाचंही प्रदर्शन लांबणीवर गेलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची मोठी निराशा झाली आहे.

त्यामुळे झिम्मा या चित्रपटांतील सर्व कलाकारांनी एकत्र येतं यासंदर्भात एक व्हिडीओ तयार केली आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.

‘झिम्मा चा प्रवास सुरु झाला, तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हा प्रवास थिएटर पर्यंत रंगत जाणार असं वाटत असतानाच पुन्हा एकदा आपण सारेच कोरोनाच्या विळख्यात अडकलो. आता वेळ आली आहे एकमेकांची काळजी घेण्याची. कोरोनासोबत दोन हात करण्याची. सगळं काही सुरळीत झाल्यावर पुन्हा नव्या जोमाने,आनंदाचा खेळ म्हणजेच झिम्मा खेळुया . सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन करून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊया. लवकरच भेटूया, ‘चित्रपटगृहातच!’  असं सोनालीने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.

दरम्यान, झिम्मा या चित्रपटामध्ये सात वेगवेगळ्या वयोगटातील महिला आहेत. त्यामधील एक महत्वाची भूमिका सायली संजीवने साकारली आहे. तसेच सायलीसोबत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेवकर, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

महत्वाच्या बातम्या-

राशीभविष्य: आज ‘या’ राशीच्या लोकांना होणार धनलाभ

‘या’ बड्या अभिनेत्री देखील लग्नाआधी होत्या…

भाऊ कदम कसे करतात स्क्रिप्टचे पाठांतर?, पाहा व्हिडीओ

देसी जुगाड वापरत ‘या’ काकांनी ब्लेडशिवाय केली…

सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला राखी सावंतने सुनावले असे…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy