मुंबई | बॉलिवूड मधील बरेच कलाकार सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. या चंदेरी दुनियेतील कलाकारांच्या प्रेम कहाण्यांचे किस्से तर एखाद्या फिल्म स्टोरीपेक्षा कमी नसल्याचे ऐकायला मिळतं. बॉलिवूड मधील बऱ्याच प्रेमकहाण्या आजवर गाजल्या. यातील काही जोडप्यांच्या प्रेमकहाण्या यशस्वी झाल्या तर काहींच्या फक्त चर्चाच रंगल्या.
असंच चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूडच्या जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचं. या दोघांची जोडी अनेकांच्या आवडीची आहे. 2007 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे दोघे विवाहबद्ध झाले होते.
बॉलिवूडमधील हे सर्वांचं लाडकं जोडपं नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय असतं. ते सतत सोशल मिडीयावरून काही न काही शेअर करत असतात. या दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सतत सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. अशातच सध्या अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक दाघे डांस करताना दिसत आहेत. एका खूप जुन्या अॅवार्ड शो दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या दोघांचेही चाहते या व्हिडिओला भरभरुन लाईक करत आहेत.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसेल की, अभिषेक स्टेजवर डांस करत असतो. ऐश्वर्या स्टेजच्या समोर पहिल्या रांगेत बसलेली आहे. अभिषेक अचानक स्टेजवरुन खाली येतो. यानंतर तो ऐश्वर्याच्या हाताला धरुन तिला ओढत स्टेजवर घेऊन जातो.
यावेळी स्टेजवर ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपटातील गाणं सुरु असतं. हे दोघे या गाण्यावर तुफान डांस करतात. उपस्थीत प्रेक्षक देखील याला भरभरुन प्रतिसाद देतात. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेकचा हाच व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहे.
दरम्यान, 1994 साली ऐश्वर्याने अभिनेता बॉबी देओलसह ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर ऐश्वर्याने हिंदीबरोबरच तामिळ, तेलगू, बंगाली आणि इंग्रजी भाषेत अनेक सिनेमे केले. 1994 साली ऐश्वर्यानं ‘मिस वर्ल्डचं विजेतेपद पटकावलं आहे.
तसेच अभिषेक बच्चनने 2000 साली चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. अभिषेकने देखील आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रन, धूम, बोल बच्चन यांसारख्या अनेक चित्रपटांतील अभिषेकची भूमिका प्रेक्षकांच्या नेहमी आठवणीत राहते.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
दहावी-बारावीच्या बोर्ड परिक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाल्या…
काय सांगता! 10 सेकंदाचा ‘हा’ व्हिडीओ तब्बल 48 करोडला विकला गेला; पाहा व्हिडीओ
कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
…..म्हणून ‘या’ महिलेनं शेअर केला टाॅयलेट मधला फोटो
निवडणुकीपूर्वी राज्यात खळबळ; ‘या’ नेत्यानं राजकारणाला ठोकला रामराम