Top news मनोरंजन

रोमॅन्टिक सीन करताना शाहरुखनं काजोल सोबत केलं ‘हे’ कृत्य, ज्यामुळे काजोलही झाली होती शाॅक

Photo Credit - kajol devgan & shahrukh khan/ Instagram

बाॅलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय जोड्या पहायला मिळतात. त्यांच्यापैकीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे काजोल आणि शाहरुखची जोडी. या जोडीनं अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले पहायला मिळाले. या जोडीनं अनेक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलेलं पहायला मिळालं. एवढंच नाही तर या जोडीची पडद्यावरील केमिस्ट्री पहायला लोकांना नेहमीच आवडत असते. काजोलनं तिच्या आणि शाहरुखच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा अनुभव शेअर करताना एक है.राण करणारा किस्सा सांगितला.

काजोल आणि शाहरुखनं ‘बाजीगर’ या चित्रपटात प्रथम एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातून या जोडीला भरपूर प्रतिसाद मिळाला. यानंतर ही जोडी हिट ठरली. या चित्रपटात रोमाॅन्टिक सीन्स करताना शाहरुखनं असं काही केलं ज्यामुळं काजोल देखील हैराण झाली होती.

बाजीगर चित्रपटाची शुटींग करत असताना हा किस्सा घडल्याचं काजोलनं म्हटलं. रोमॅन्टिक सीनचं शुटींग करत असताना शाहरुखनं काजोलला चक्क चिमटा काढला. यावेळी काजोल हैराण झाली असल्याचं तीनं म्हटलं. या गोष्टीचा खुलासा काजोलनं करण जौहरच्या चॅट शोमध्ये केलेला पहायला मिळाला. करण जौहरच्या ‘काॅफी विथ करण’ या शोमध्ये काजोलनं शाहरुख सोबतचा हा किस्सा शेअर केलेला पहायला मिळाला.

‘काॅफी विथ करण’ या चॅट शोमध्ये तेव्हा शाहरुख खान देखील उपस्थित असलेला पहायला मिळाला. याविषयी बोलताना शाहरुखनं म्हटलं की, शुटींग दरम्यानचा हा सीन एक रोमॅन्टिक सीन होता. ‘मेरा दिल था अकेला, मैने खेल ऐसा खेला ‘…..या गाण्यात काजोलला श्वास फुलवत अभिनय करायचा असून तिने या आधी कधी असा सीन केला नव्हता. त्यामुळे याचा अभिनय करनं काजोलला कठीण जात होतं.

पुढे शाहरुखनं म्हटलं की, ही गोष्ट तिच्यासाठी करनं असामान्य असून सामान्यपणे करता येणं अशक्य होतं आणि काजोलला नेहमीच असामान्य असे शॅाट करायला आवडतात. परंतु यावर काजोल म्हणाली, तो सीन मी केला असता पण तो सीन फारच वेगळा होता त्यामुळे मला तो योग्य वेळेत जमला देखील नसता व मी करु शकत नव्हते .

यावर शाहरुखनं सांगितले, हा सीन करनं गरजेच होत. सीन चांगला यावा म्हणून सरोज खान मला कानात म्हणाल्या, तु काजोलला चिमटा काढ. त्यामुळे मी सरोज खानचे ऐकूण सीन करताना काजोलला चिमटा काढला. त्यावर काजोल चिडली पण सीन एकदम परफेक्ट झाला.

बॉलिवूडमधील सगळ्यात रोमॅन्टिक जोडी म्हणजे शाहरुख खान आणि काजोल यांची. दोघांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या चित्रपटापासून दोघांची केमिस्ट्री चर्चेत आली. याशिवाय काजोल आणि शाहरुखची मैत्री देखील खूप घट्ट असलेली पहायला मिळते.

महत्वाच्या बातम्या –

चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या…

तुम्हीही सिंगल असण्याला कंटाळला आहात का? आजच स्वत:मध्ये करा हे बदल, लगेच मिळेल गर्लफ्रेंड!

फार मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे भाव स्थिरावले; वाचा ताजे दर

आणखी एक टिकटॉक स्टार काळाच्या पडद्याआड! राहत्या घरी केली आत्मह.त्या

नेहा कक्करला आहे ‘हा’ आजार, स्वतःच केला खुलासा म्हणाली….