तुम्ही पण प्लास्टिकच्या डब्ब्यातून जेवण जेवता का?, मग ही बातमी एकदा वाचाच

मुंबई | प्लास्टिकच्या डब्ब्यातून जेवण करण्याची अनेकांना सवय असते. प्लास्टिकच्या डब्ब्यातून जेवण करणं आरोग्यासाठी घातक असतं, असे अनेक मेसेज व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होत असतात.

प्लास्टिकच्या डब्ब्यात अनेक हानीकारक केमिकल असतात. असं अन्न खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते, असा दावा सोशल मीडियावर केला जातो.

अनेक लोकं प्लास्टिकच्या कपमधून सर्रास चहा, कॉफी पितात. हॉटेलमधून ऑनलाईन जेवण मागवलं तरी ते प्लास्टिकच्या डब्ब्यातच पॅक होऊन येतं.

दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरात तर प्लास्टिकचे कप, डिश यांनाच जास्त प्राधान्य दिलं जातं. पण या अशा अन्नामुळे भयानक आजार होतात, असा दावा देखील केला जातो.

प्लास्टिक हे उष्ण पदार्थांच्या संपर्कात आलं तर त्यातील अन्न पदार्थात घातक केमिकल्स तयार होतात. यामुळे 32 प्रकारचा कर्करोग होण्याची भीती असते, असा एक मेसेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ही माहिती कितपत खरी आहे याबद्दल तज्ज्ञांकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. प्लास्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांमधील महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

प्लास्टिकमध्ये शरीराला घातक असलेल्या काही केमिकल निर्माण करणाऱ्या घटकांचा समावेश असतो. त्यामुळे प्लास्टिकच्या डब्यात अन्न ठेवणे कितपत घातक आहे हे संशोधनानंतरच सिद्ध होईल, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

प्लास्टिकमधील काही केमिकल्स बाहेर पडण्याचा धोका असतो. आपण खात असलेल्या अन्नात किंवा पेयात हे केमिकल्स प्रवेश करू शकतात. यामुळे लठ्ठपणा आणि प्रजनन क्षमतेसारख्या समस्या उद्भवू शकतात.

साधारण हलक्या प्रतीच्या प्लास्टिकच्या डब्ब्यातून अन्न खाणं जास्त धोकादायक असतं. गरम पदार्थ प्लास्टिच्या डब्ब्यातून खाणे हे देखील तितकंच धोकादायक आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’, ‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांची MPSCला विनंती

“नितेश राणे हरवला आहे, शोधणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस”

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू

टेन्शन वाढलं! राज्यातील ‘या’ पाच बड्या नेत्यांना कोरोनाची लागण

‘जवा बघतीस तू माझ्याकडं’ गाण्यावर आमदाराने धरला ठेका; पाहा व्हिडीओ