‘ईडी’कडून काँग्रेसच्या आणखी एका मोठ्या नेत्याला अटक!

नवी दिल्ली | काँग्रेसचे कर्नाटकातील दिग्गज नेते डीके शिवकुमार यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. पैशांची अफरातफर प्रकरणी गेल्या चार दिवसांपासून त्यांची चौकशी सुरु होती.

कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार आणि कर चुकवणे याप्रकरणी आयकर विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर ईडीने पैशांची अफरातफर केल्याचा आरोप करत शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

शिवकुमार यांची पीएमएलए कायद्यांतर्गत शुक्रवारी चार तास आणि शनिवारी आठ तास चौकशी करण्यात आली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशीही चौकशीला बोलावण्याने शिवकुमार यांनी नाराजी व्यक्त केली होती.

ईडीने समन्स दिल्याच्या विरोधात शिवकुमार यांनी कर्नाटक हायकोर्टातही धाव घेतली. पण कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर व्हावं लागलं.

महत्वाच्या बातम्या-