Top news महाराष्ट्र मुंबई

“रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी”

sanjay raut and modi e1643711647192
Photo Credit- Facebook/Sanjay Raut & Twitter / @narendramodi

मुंबई | नागपूरचे वकील सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा तपास यंत्रणा तसेच भाजपवर सडकून टीका केली आहे.

सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे काही अपराध असतील. त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले असतील, त्यांनी जमीन लुटली असेल, त्यांनी जमीन बळकावली असेल, त्यांनी कुणाला धमकी दिली असेल तर महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील, असं राऊत म्हणाले.

ईडीने खास येऊन तपास करावा आणि धाडी घालाव्यात असा हा गुन्हा नाहीये. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करतात. हा राज्यांतील पोलिसांचा सरळ सरळ अतिक्रमण आहे. मी म्हणतो ना उकेनी गुन्हा केला असेल तर भादंविनुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं संजय राऊत म्हणाले.

ज्या प्रकारे काश्मीरमध्ये अचानक अतिरेकी घुसतात. बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात. त्याच प्रकारे या केंद्राच्या अतिरेकी कारवाया आहेत. तपास यंत्रणांना राज्यात घुसवलं जातं आणि ते अटक करून निघून जातात, असं ते म्हणालेत.

जर यातून संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्य हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. म्हणून ममता बॅनर्जी यांनी गैरभाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्रं पाठवलं आहे. त्यांचं पत्रं हे याच भूमिकेतून लिहिलं आहे, असं राऊत म्हणाले.

सर्वांनी एकत्र येण्याची त्यांची भूमिका त्याच गोष्टीसाठी आहे, असं सांगतानाच केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. आता रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपास सीबीआय आणि ईडीकडून करण्याचीच तेवढी गरज आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या दाव्याने खळबळ, म्हणाले… 

ग्राहकांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला 

“यशस्वी व्हायचं असेल तर त्यांच्यासोबत सेक्स करावं लागेल” 

कामावर न परतलेल्या कर्मचाऱ्यांबाबत अनिल परबांनी घेतला मोठा निर्णय! 

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर