मुंबई | गोरेगाव पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) (दि. 31 जुलै) रोजी अटक केली होती. त्यांना विशेष सत्र न्यायालयाने आजपर्यंत (4 ऑगस्ट) ईडी कोठडी सुनावली होती.
आज त्यांच्यावर विशेष न्यायालयात सुनावणी झाली. ईडीच्या हाती आता राऊतांच्या विरोधात वेगळ्या प्रकरणाचे पुरावे लागले आहेत.
ईडीच्या माहितीनुसार तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन राऊतांनी अलिबागमध्ये (Alibaug) 10 ठिकाणी जमीन खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
प्रवीण राऊत (Praveen Raut) यांनी संजय राऊतांना मोठ्या प्रमाणात रोख पैसे दिले होते. त्याच पैशांतून संजय राऊतांनी अलिबाग आणि मुंबईत (Mumbai) फ्लॅट घेतले होते. असा दावा ईडीकडून न्यायालयात करण्यात आला.
तसेच प्रवीण राऊत यांना म्हाडाच्या पत्राचाळ पुनर्विकासाची परवानगी संजय राऊत यांच्यामुळे मिळाली होती. त्यामुळे प्रवीण राऊतांनी मोठ्या प्रमाणात संजय राऊतांना पैसे दिल्याचा संशय ईडीला आहे. त्यानुसार ईडीचा तपास सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर अधिक तपासासाठी ईडीकडून संजय राऊतांच्या कोठडीत वाढ होण्याची मागणी केली जात आहे. राऊतांच्या संबंधित दोन ठिकाणी केलेल्या छापेमारीवर महत्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘गुजरात दंगलीतून नरेंद मोदींना…’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
“अखेर नड्डा देखील सब घोडे बारा टक्के निघाले”
उर्फीने कपड्यांऐवजी गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ
भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते होणार- नितीन गडकरी
मनसेचे शिंदे गटावर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ