नवी दिल्ली | काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना समन्स बजावलं आहे. सोनिया गांधी यांना 8 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आलीये.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. आठ जूनपर्यंत राहुल गांधी परतल्यास तेही चौकशीला सामोरे जातील. अन्यथा ईडीकडे वेळ मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ईडी समोर हजर न राहण्याचा पर्याय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर आहे. पहिल्या नोटीसला उत्तर न देता त्याकडे दुर्लक्ष करता येईल. अशा स्थितीत ईडीकडून त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात येईल. दुसरा पर्याय म्हणजे ईडीच्या नोटिशीला कोर्टात आव्हान देण्याचा मार्ग त्यांच्यासमोर आहे.
ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कटाचा एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. पण आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही… छाती ठोकून लढणार, असं सुरजेवाला म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; महापालिकेनं केलं ‘हे’ आवाहन
केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा
पुतिन यांच्या मृत्यूच्या अफवेवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा!
केकेचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, मृत्यूच्या काही तास आधीच…
LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाला स्वस्त