ईडीकडून मंत्री नवाब मलिकांची पहाटेपासून चौकशी सुरू, काय आहेत आरोप?

मुंबई | अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची अखेर ईडीने (ED) चौकशी सुरू केल्याचे समजतंय.

नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी सुरू आहे. नवाब मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पहाटेच धडकले. त्यांनी मलिकांना आपल्या कार्यालयात नेत सकाळी पावणेआठच्या सुमारास चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.

मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केलीये.

या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत.

या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकलीय, असा आरोप फडणवीस यांनी केला होता.

अंमली पदार्थ नियामक कक्षाचे  तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मलिकांनी केलेल्या आरोपांनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं.

दरम्यान, कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिकांवर करण्यात आलेली कारवाई सूडाच्या भावनेनं केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपनं मात्र निरपेक्षपणे ईडी कारवाई करत असल्याचं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या- 

राष्ट्रवादीचा भाजपला जोरदार झटका; रात्री बारा वाजता केला करेक्ट कार्यक्रम 

“येत्या विधानसभेत 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणारच” 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस विभागात नोकरीची सुवर्णसंधी! 

‘मॅचपूर्वी सेक्स केल्याने मला…’; ‘या’ प्रसिद्ध माजी खेळाडूचा मोठा खुलासा

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ