मुंबई | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडाळीनंतर राज्यात मोठं राजकीय वादळ आलं.
शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीचं खापर खासदार संजय राऊत यांच्या डोक्यावर फुटत आहे. संजय राऊतांवर आमदारांनी टीकास्त्र डागलं असताना ईडीने राऊतांना आणखी एकदा दणका दिला आहे.
मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी ईडीने राऊतांना तिसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने राऊतांना समन्स बजावलं आहे.
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने राऊतांना पहिल्यांदा समन्स बजावल्यानंतर राऊत चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर ईडीने दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर राऊत 1 जुलै रोजी ईडी चौकशीला सामोरे गेले.
संजय राऊतांची तब्बल 10 तास चौकशी झाल्यानंतर त्यांना आता तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं आहे. त्यात संजय राऊत सध्या दिल्लीत असल्याने ते चौकशीला हजर राहणार का?, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ बांधकाम प्रकरणी गैरव्यवहार केल्याचे आरोप संजय राऊतांवर आहेत. तर मागील चौकशीपूर्वी ते ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हणाले होते.
दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडी बघता संजय राऊतांना सुडबुद्धीने यात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे का?, अशा चर्चा सध्या रंगत आहेत. तसेच या प्रकरणाला कोणतं वळण लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“पूर्वीचे सुलतान मंदीरं पाडायचे आणि आताचे सुलतान शिवसेना पाडत आहेत”
नवाब मलिकांना दिलासा नाहीच, ईडीचा मलिकांना आणखी एक झटका
“प्रलोभनाला आम्ही कुत्र्यासारखे टांग वर करून दाखवतो अन् दबावाला…”
उद्धव ठाकरेंबाबत खासदार राहुल शेवाळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!
उद्धव ठाकरे आक्रमक; भाजपला दिला ‘हा’ गंभीर इशारा