दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; खाद्यतेलांच्या किंमतीत घट, जाणून घ्या सविस्तर वृत्त

मुंबई | देशात महागाईने डोके वर काढले आहे. खाद्यतेल (Edible Oil) आणि इतर रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या वाढलेल्या किंमतीने जनता हैराण आहे. त्यात आता दिवाळसण येऊ घातला आहे.

त्यामुळे यंदाच्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलांच्या किमंती कमी होण्याची शक्यता आहे. देशात खाद्यतेलांच्या किमंती घसरण्याची शक्यता आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात पामतेलाच्या आयातीमध्ये 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात 10 लाख टन तेल आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी महिन्यात खाद्यतेल स्वस्त होणार आहे. भारताने मागील ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात तेलाची आयात केली आहे.

जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात जास्त प्रमाणात तेल आयात केेले गेले. या वर्षीच्या गेल्या अकरा महिन्यातील ही सर्वात मोठी आयात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पामतेलाच्या किमंती 40 टक्क्यांनी घसरल्या.

पामतेलाच्या किंमतीत 1800 – 1900 डॉलर मेट्रीक टनावरुन 1000 – 1100 डॉलर मेट्रीक टन वर घसरण झाली आहे. इतर खाद्यतेलापेक्षा स्वस्त असलेले पामतेल जास्त प्रमाणात आयात केले गेले.

आगामी सणांचा काळ लक्षात घेता, पामतेलाची आयात मोठ्या प्रमाणात केली गेली आहे. त्यामुळे पामतेल (Palm Oil) स्वस्त होण्याची शक्यता आहे. सरकारने पामतेलाच्या आयातीवर 5.5 टक्के कर आकारला आहे.

तसेच आगामी काळात सोयाबीन तेल (Soybean Oil) आणि सूर्यफूल तेलाची (Sunflower Oil) आयात चालू आणि पुढील वर्षासाठी करमुक्त (Tax Free) म्हणजे शुल्कमु्क्त करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

मविआचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; देशमुखांच्या अडचणी वाढल्या

बंगालमध्ये मोर्च्यादरम्यान भाजपचा मोठा हिंसाचार; पोलिसांचा बळाचा वापर

“ज्या मुलीने वयाच्या 13 व्या वर्षी घाण्यारड्या चित्रपटांतून प्रसिद्धी मिळविली…” किशोरी पेडणेरकरांचा मोठा दावा

पितृपक्षामुळे मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला नाही या अजित पवारांच्या टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर

“नरेंद्र मोदींनंतर भाजप सोनिया गांधी यांना…”; अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा